सैफचा लेक करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, इब्राहिमच्या 'नादानियाँ' सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:29 IST2025-02-01T13:28:35+5:302025-02-01T13:29:03+5:30

इब्राहिम 'नादानियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नादानियाँ असं त्याच्या सिनेमाचं नाव असून त्याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

saif ali khan son ibrahim khan bollywood debut with khushi kapoor nadaaniyan poster release | सैफचा लेक करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, इब्राहिमच्या 'नादानियाँ' सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर

सैफचा लेक करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, इब्राहिमच्या 'नादानियाँ' सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इब्राहिमने अभिनयाची वाट धरली आहे. इब्राहिम 'नादानियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाचं नाव पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

इब्राहिमसोबत या सिनेमात अभिनेत्री खुशी कपूर दिसणार आहे. या पोस्टरवर खुशी आणि इब्राहिम दिसत आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर शौना गौतम यांनी दिग्दर्शन केलं आहे. इब्राहिम आणि खुशी कपूरचा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 


इब्राहिम हा सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा आहे. सैफ आणि अमृताची लेक सारा खानही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. सारा खानने केदारनाथ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता सारा पाठोपाठ इब्राहिमदेखील अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. 
 

Web Title: saif ali khan son ibrahim khan bollywood debut with khushi kapoor nadaaniyan poster release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.