हृतिक रोशनच्या बॉलिवूड एंट्रीमुळे सैफ अली खानने घेतला होता धसका!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2017 04:45 PM2017-06-02T16:45:02+5:302017-06-02T22:15:02+5:30
हृतिक रोशन बॉलिवूडचा असा कलाकार आहे, ज्याने गुड लुक्स, नीळे डोळे अन् डान्सच्या वेगळ्याच शैलीमुळे स्वत:चा ठसा उमटविला आहे.
ह तिक रोशन बॉलिवूडचा असा कलाकार आहे, ज्याने गुड लुक्स, नीळे डोळे अन् डान्सच्या वेगळ्याच शैलीमुळे स्वत:चा ठसा उमटविला आहे. आजही इंडस्ट्रीमध्ये त्याच्या गुड लुक्सचा कोणी सामना करू शकत नाही. कदाचित त्यामुळेच त्याला इंडस्ट्रीचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून संबोधले जात असावे. असो, आज हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे हृतिकच्या याच गुड लुक्समुळे एका अभिनेत्याची अक्षरश: झोप उडाली होती. हृतिकच्या बॉलिवूड एंट्रीमुळे अन् त्याच्या गुड लुक्सची सर्वदूर होत असलेल्या चर्चेमुळे अभिनेता सैफ अली खान प्रचंड अस्वस्थ झाला होता.
हे आम्ही सांगत नसून, सैफ अली खान यानेच याविषयीचा खुलासा केला होता. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याने याबाबतचा उलगडा केला होता. त्यावेळी सैफने असेही म्हटले होते की, त्याला हिंदी चित्रपट बघायला अजिबात आवडत नाहीत. अनुपमा चोपडा यांच्याशी चर्चा करताना त्याने हा सर्व उलगडा केला होता. सैफच्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर चौफर टीका करण्यात आली होती. ज्यामुळे त्याला नंतर जाहीर माफीही मागावी लागली होती. त्यावेळी सैफने म्हटले होते की, मी जे बोलले ते अजिबात सिरियसली घेतले जाऊ नये. कारण मी माझ्या आईला चित्रपटात रडताना बघू शकत नाही. तसेच त्याने हेही म्हटले होते की, मला हिंदी चित्रपटांपेक्षा अमेरिकन टीव्ही शोज बघायला आवडतात. कारण हे शोज बघून माझ्यात अजिबात कॉम्पिटीशनची भावना निर्माण होत नाही.
त्याचबरोबर सैफने हृतिकच्या गुड लुक्सची भीती वाटत असल्याचेही म्हटले होते. मला सातत्याने असे वाटत होते की, मला आता या हॅण्डसम हंकला कॉम्पिट करावे लागणार आहे. हृतिकच्या गुड लुक्समुळे मी कित्येक रात्र व्यवस्थित झोपलो नव्हतो. स्ट्रेसमुळे मी बºयाचदा जीममध्ये ठाण मांडून बसत होतो. सैफ गेल्यावर्षी ‘रंगून’ या चित्रपटात बघावयास मिळत होता. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे हे वर्ष सैफसाठी खूपच आव्हानात्मक असणार आहे.
यावर्षी सैफचे तीन चित्रपट रिलीज होणार आहेत. त्याचबरोबर काही दिवसांपासून सैफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणतो की, मला अमृताला पाच कोटी रुपये द्यायचे होते. त्यावेळी माझी आर्थिक स्थिती खूपच बिकट होती. त्यामुळे मी तिला फक्त अडीच कोटी रुपयेच देऊ शकलो. त्याचबरोबर त्याने हेही म्हटले होते की, मुलांच्या पालनपोषणासाठी मी दर महिन्याला अमृताला एक लाख रुपये देत होतो. मुले जोपर्यंत १८ वर्षांचे होत नाहीत, तोपर्यंत मी पैसे देणार असे मी अमृताला वचन दिले होते. मी काही शाहरूख खान नव्हतो, अशातही मुलांच्या फ्यूचरसाठी अमृताने सांगितलेल्या सर्व गोष्टी मी मान्य केल्या होत्या.
मी चित्रपट, टीव्ही आणि जाहिरातींमधून जेवढे कमाविले होते तेवढे पैसे मी माझ्या मुलांच्या पालनपोषणासाठी अमृताला देत होतो. मी माझा बंगलाही अमृताच्या नावे केला होता. अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफला प्रचंड आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला होता.