'ओमकारा'मधील लंगडा त्यागीच्या भूमिकेसाठी सैफ अली खान नव्हता पहिली पसंती, लागली असती या सुपरस्टारची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:12 PM2023-07-31T13:12:14+5:302023-07-31T13:12:47+5:30

Omkara Movie : 'ओमकारा' २००६ साली रिलीज झाला होता, ज्यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, करीना कपूर, विवेक ओबेरॉय, बिपाशा बसू, कोंकणा सेन शर्मा आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Saif Ali Khan was not the first choice for the role of the lame Tyagi in 'Omkara', the superstar should have been cast | 'ओमकारा'मधील लंगडा त्यागीच्या भूमिकेसाठी सैफ अली खान नव्हता पहिली पसंती, लागली असती या सुपरस्टारची वर्णी

'ओमकारा'मधील लंगडा त्यागीच्या भूमिकेसाठी सैफ अली खान नव्हता पहिली पसंती, लागली असती या सुपरस्टारची वर्णी

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यांना क्लासिक चित्रपट मानले जाते. १७ वर्षांपूर्वी आलेला ओमकारा (Omkara) हा चित्रपट त्यापैकीच एक होता. ज्याची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट फिल्म्समध्ये केली जाते. ओमकारा २००६ साली रिलीज झाला होता, ज्यामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, करीना कपूर, विवेक ओबेरॉय, बिपाशा बसू, कोंकणा सेन शर्मा आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. या सर्वांनी या चित्रपटात आपली अतिशय सशक्त भूमिका साकारली, जी आजही स्मरणात आहे. त्यापैकी एक भूमिका म्हणजे लंगडा त्यागीची, जी सैफ अली खान(Saif Ali Khan)ने उत्कृष्टपणे साकारली होती.

पण तुम्हाला माहित्येय का की, आमिर खानला सर्वप्रथम ओमकारा चित्रपटात लंगडा त्यागीची भूमिका करायची होती. होय, प्रत्यक्षात आमिर खानने विशाल भारद्वाज यांना ओमकाराची कल्पना दिली होती. आमिर चित्रपटाबाबत इतका सीरियस होता की त्याला ओमकाराचा निर्माताही व्हावे असे वाटत होते. याशिवाय त्याला स्वतः या चित्रपटात लंगडा त्यागीची भूमिका करायची होती. मात्र सैफ अली खानला भेटल्यानंतर विशाल भारद्वाजने त्याची लंगडा त्यागीच्या भूमिकेसाठी निवड केली. याचा राग आमिर खानला आला आणि त्याने स्वतःला चित्रपटापासून पूर्णपणे वेगळे केले.

ओमकाराला मिळाला उदंड प्रतिसाद
मात्र, काही काळानंतर आमिर खान आणि विशाल भारद्वाज यांच्यातील संबंध पूर्ववत झाले. ओमकारा हा चित्रपट केवळ कथेच्याच नव्हे तर गाण्यांच्या बाबतीतही हिट ठरला होता. या चित्रपटातील 'बिडी जले ले' आणि 'नमक इश्क का' हे चित्रपट खूप गाजले. काही संगीतप्रेमींना आजही हे दोघे खूप आवडतात. 'बिडी जले ले' आणि 'नमक इश्क का' ही गाणी बिपाशा बसूवर चित्रित करण्यात आली होती. ओमकारा या चित्रपटाने फिल्मफेअरमध्येही अनेक पुरस्कार पटकावले.

Web Title: Saif Ali Khan was not the first choice for the role of the lame Tyagi in 'Omkara', the superstar should have been cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.