कोणत्याही डाएट शिवाय सैफ अली खानने कमी केले चक्क 11 किलो वजन, जाणून घ्या कसे ते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 10:37 AM2019-10-01T10:37:38+5:302019-10-01T10:44:26+5:30

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वजन कमी केल्यामुळे चर्चेत आला आहे. कमी वेळेत सैफने 11 किलो वजन कमी केले आहे.

Saif ali khan weight loss diet | कोणत्याही डाएट शिवाय सैफ अली खानने कमी केले चक्क 11 किलो वजन, जाणून घ्या कसे ते

कोणत्याही डाएट शिवाय सैफ अली खानने कमी केले चक्क 11 किलो वजन, जाणून घ्या कसे ते

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वजन कमी केल्यामुळे चर्चेत आला आहे. कमी वेळेत सैफने 11 किलो वजन कमी केले आहे. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार सैफने याचे श्रेय घरच्या जेवणाला आणि बेसिक वर्कआऊटला दिले आहे. रिपोर्टनुसार सैफ अली खान काही अशा काही भूमिका साकारतोय ज्यामुळे त्याला वजन कमी करण्याची गरज लागली. सेक्रेड गेम्स आणि तानाजीमधील भूमिकेत सैफला फिट दिसायचे होते. तसेच जवानी जानेमनमध्ये  त्याचा लूक आधुनिक असल्याने त्याने वजन कमी असेल. 


सैफच्या जवानी जानेमनमधील फर्स्ट लूक रिवील झाला. लूक आऊट झाल्यावर सैफच्या या लूकचं कौतूक झालं. जावानी  जानेमनमधील सैफचा लूक बघून कॉकटेल आणि लव आजकल सिनेमाची आठवण झाली. सैफ सध्या ट्रेनरच्या मदतीशिवाय जिममध्ये कार्डिओ करतोय. तसेच तो बाहेरचा खाणं टाळतो आहे.  


‘तानाजी – द अनंसंग वॉरियर’ सिनेमात सैफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. त्यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या सिनेमात अभिनेता अजय देवगन तानाजींची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खानदेखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.२२ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे

Web Title: Saif ali khan weight loss diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.