राजकीय नाट्यावर आधारीत सैफ अली खानचा 'तांडव', टीझर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 07:58 PM2020-12-17T19:58:13+5:302020-12-17T19:58:40+5:30

सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली वेबसीरिज 'तांडव'चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Saif Ali Khan's 'Tandav', a teaser based on a political drama, has been released | राजकीय नाट्यावर आधारीत सैफ अली खानचा 'तांडव', टीझर झाला रिलीज

राजकीय नाट्यावर आधारीत सैफ अली खानचा 'तांडव', टीझर झाला रिलीज

googlenewsNext

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेली वेबसीरिज तांडवचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. या राजकीय नाट्याला अली अब्बास जफरने दिग्दर्शित केले आहे. तर या वेबसीरिजची निर्मिती हिमांशु मेहरा आणि अली अब्बासने केली आहे. ही सीरिज १५ जानेवारीला भेटीला येणार आहे.

तांडवच्या एका मिनिटाच्या टीझरची सुरूवात गर्दीच्या घोळक्यात आणि राजकीय झेंड्यांनी होते. सैफ अली खान एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत पहायला मिळतो आहे. टीझरमध्ये सैफची दमदार एन्ट्री पहायला मिळतेय. बॅकग्राउंडला व्हॉइस ओव्हरमध्ये ऐकायला मिळतंय की हिंदुस्तान को सिर्फ एकही चीज चलाती है, राजनीती. इस देश में जो प्रधानमंत्री है वो ही राजा है. 


अली अब्बास जफर म्हणाले, तांडवच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना राजकारणाच्या सत्तेची भुख असणाऱ्या जगाचे दर्शन घडवितो. आपण हा शो पाहताच आपल्या लक्षात येईल, की तेथे कुणीही बरोबर किंवा चुकीचे नाही,किंवा काही काळे पांढरे ही नाही; यातील परिदृश्य हे सत्तेच्या अंधकारात बुडालेल्या जगा बद्दल आहे. माझा विश्वास आहे की यातील विषयासोबतच या मागील कलाकारांच्या कामगिरीचे समर्थन केले गेले जाईल आणि असा हा भारदस्त शो करण्याचे मला भाग्य लाभले ही मी माझी जमेची बाजू समजतो.
हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर द्वारा निर्मित या 9 भागाच्या राजकीय नाटकात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी या सारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

 

Web Title: Saif Ali Khan's 'Tandav', a teaser based on a political drama, has been released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.