टेक्नीक ही गलत है, पोस्टर बनानेवाले चाचा...! ‘सायना’ चित्रपटामुळे परिणीती चोप्रा झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 12:28 PM2021-03-04T12:28:26+5:302021-03-04T12:28:42+5:30
Saina Nehwal biopic: काहींनी तर, सायनाने या पोस्टरला सहमती दिलीच कशी असाही प्रश्न उपस्थित केला....
अभिनेत्री परिणीती चोप्राचा ‘सायना’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर बेतलेला आहे, हे नावावरून तुमच्या लक्षात आलेच असेल. कालपरवा या सिनेमाचे पोस्टर रिलीज झाले आणि परिणीतीच्या या सिनेमाची नेटक-यांनी जबरदस्त खिल्ली उडवली.
पोस्टर पाहताच लोकांनी त्यामधील चूक अगदी क्षणात हेरली. मग काय, सोशल मीडियावर या पोस्टरचे चांगलेच हसे झाले. यानिमित्ताने परिणीतीही ट्रोल झाली.
Is it Sania mirza biopic Or Saina Nehwal's 😅
— ಕನ್ನಡಿಗ (@mysorerocks) March 2, 2021
चित्रपट हा बँडमिंटनपटू सायना नेहवालच्या कारकिर्दीवर बेतलेला असल्यामुळे या खेळाशीच संबंधित असा शटल पोस्टरमध्ये दाखवण्यात आला आहे. सर्व्हिस देण्यापूर्वी शटल हवेत उडवतानाच्या क्षणांचा आधार घेत हे कलात्मक पद्धतीने हे पोस्टर साकारण्यात आले आहे. पण, यादरम्यान क्रिएटीव्ह टीमने मोठी चूक केली. होय, बॅडमिंटनमध्ये सर्व्हीस करताना शटल वर उंचावलेले पोस्टरमध्ये दाखवले आहे. मात्र, बॅडमिंटनची सर्व्हीस अशी होत नाही. पोस्टरमध्ये दाखवलेली सर्व्हीस टेनिसमध्ये होते. टेनिस आणि बॅडमिंटन यातील सर्व्हीस करण्याची पद्धत वेगवेगळी असते. हीच बाब लोकांनी लक्षात आणून दिली. ‘टेक्निक ही गलत है तुम्हारी’, असे एका युजरने यावर लिहिले.
Parineeti to Saina: pic.twitter.com/dknEKSTBUu
— Piyush Sharma (@PiyushS24196569) March 2, 2021
‘सेरेना विल्यम्स पे नही है बायोपिक, पोस्टर बनानेवाले चाचा,’ असे लिहित एका मजा घेतली. सायनाने या पोस्टरला सहमती तरी कशी दिली? असे एका युजरने लिहिले.
I got confused between Saina and Sania seeing the shuttle being served like that!! https://t.co/l3PJPAYlIS
— Pragya Rathore (@pragsrats) March 2, 2021
Oh the tennis star??
— Husbanding (@tapanwaval) March 2, 2021
Serena williams pe nai hai biopic poster banane wale chacha...🤨🤨
— Superheroes (@superrheroes) March 2, 2021
‘सायना’ हा चित्रपट 26 मार्च 2021 रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी केली आहे. परिणीतीच्या अगोदर या चित्रपटात श्रद्धा कपूरची भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला.यानंतर परिणीती चोप्राची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली.