दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट बंद; सायरा बानूंनी घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:30 PM2021-09-16T14:30:00+5:302021-09-16T14:30:00+5:30

Dilip kumar twitter account: दिलीप कुमार यांच्या पश्चातही हे अकाऊंट सुरु होतं. परंतु, आता ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फैजल फारुखी यांनीच ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे.

saira banu decides to close dilip kumar twitter account | दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट बंद; सायरा बानूंनी घेतला महत्त्वाचा निर्णय

दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट बंद; सायरा बानूंनी घेतला महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्दे दिलीप कुमार यांच्या निधनानंतर फैजल फारुखी हे अकाऊंट  सांभाळत होते.

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट लवकरच बंद होणार आहे. हे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय अभिनेत्री सायरा बानू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. याविषयीचं ट्विटदेखील दिलीप कुमार यांच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर फैजल फारुखी हे अकाऊंट  सांभाळत होते. मात्र, आता सायरा बानू यांच्या सहमतीने हे अकाऊंट बंद करण्यात येणार आहे.

दिलीप कुमार सोशल मीडियावर फारसे सक्रीय नव्हते. मात्र, त्यांचं ट्विटर अकाऊंट त्यांचे फॅमेली फ्रेंड फैजल फारुखी हे सांभाळत होते.विशेष म्हणजे दिलीप कुमार यांच्या पश्चातही हे अकाऊंट सुरु होतं. परंतु, आता ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फैजल फारुखी यांनीच ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे.

"बराच काळ चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर सायरा बानू यांच्या संमतीने दिलीप कुमार यांचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तुम्ही सगळ्यांनी केलेलं प्रेम आणि पाठिंबा यासाठी मनापासून आभार," असं अखेरचं ट्विट दिलीप कुमार यांच्या अकाऊंटवरुन फारुखी यांनी केलं आहे.

 शर्मिला टागोर यांनी अद्यापही घेतली नाही जेहची भेट; कारण...

दरम्यान, २०११ मध्ये दिलीप कुमार यांचं अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरु केलं होतं. आतापर्यंत त्यांचे ६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले होते. दिलीप कुमार यांचं ७ जुलै २०२१ रोजी निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी सायरा बानू असून दिलीप कुमार यांच्या निधनाचा मोठा धक्का त्यांना बसला आहे. अलिकडेच प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. 

Web Title: saira banu decides to close dilip kumar twitter account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.