दिलीप कुमार यांचा फोटो पोस्ट करत सायरा बानू यांनी दिली तब्येतीविषयी माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 08:19 PM2021-06-07T20:19:12+5:302021-06-07T20:22:53+5:30
सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांचा फोटो पोस्ट करत हा काहीच तासांपूर्वीचा फोटो असल्याचे त्यासोबत लिहिले आहे.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी सकाळी मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या तब्येतीविषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली आहे.
सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांचा फोटो पोस्ट करत हा काहीच तासांपूर्वीचा फोटो असल्याचे त्यासोबत लिहिले आहे.
Latest. An hour ago. pic.twitter.com/YBt7nLLpwL
— Dilip Kumar (@TheDilipKumar) June 7, 2021
दिलीप कुमार यांना बायलेटलर फ्ल्यूरल इफ्यूजनमुळे (Dilip Kumar Bilateral Pleural Effusion) आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तथापि त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Dilip Kumar in ICU) कार्डियोलॉजिस्ट डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एनएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. डॉ. जलील पारकर यांनी ई-टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, सर्व काही ठीक राहिले तर दिलीप कुमार यांना येत्या 2-3 दिवसांत रूग्णालयातून सुट्टी मिळेल.
#UPDATE | Veteran actor Dilip Kumar has been diagnosed with bilateral pleural effusion and kept on oxygen support in ICU ward. His condition is stable: Dr Jalil Parkar, the pulmonologist treating the actor at Mumbai's PD Hinduja Hospital pic.twitter.com/CNWWfOYxiZ
— ANI (@ANI) June 6, 2021
98 वर्षांच्या दिलीप कुमार यांना गेल्या महिन्यातही याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्थात रूटिन चेकअपसाठी दिलीप कुमार यांना भरती करण्यात आल्याचे सायरा बानो यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. कोरोना संक्रमणामुळे गेल्या वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. गतवर्षी 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले होते. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. ते 90 वर्षांचे होते.