वाजिदने वाजवलेली शेवटची धून..भाऊ साजिद खानने केली शेअर.. भावूक होऊन म्हणाला -दुनिया छूट गई...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:50 PM2020-06-03T18:50:14+5:302020-06-03T18:53:21+5:30
यात व्हिडीओत सिंगर वाजिद हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसत आहेत
बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचा किडनी व कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. वाजिद खान यांच्या निधनानंतर दोन दिवसानंतर छोट्या भाऊ साजिद खान याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो बघताना तुमच्या ही डोळ्यांच्या कडा पणावतील.
साजिदने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओत सिंगर वाजिद हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. वाजिद बेडवर बसून फोनमध्ये पियोना वाजवता येत. हा व्हिडीओ शेअर करताना साजिद म्हणाला, सर्व काही हरवले, तू कधीही संगीत सोडले नाही, किंवा संगीताने तुला सोडले नाही. माझा भाऊ लिजेंड आहे आणि लिजेंड्स कधीही मरत नाहीत. मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहिन, माझ्या आनंदात, माझ्यात तू नेहमीच असशील.”
1998 मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या गर्व, तेरे नाम, पार्टनर, दबंग यांसारख्या चित्रपटांची त्यांनी गाणी लिहिली, गायली आणि संगीतही दिले. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले.