हर आशिक है खलनायक! 'बाघी-४' सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज; संजय दत्त साकारणार व्हिलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 12:10 PM2024-12-09T12:10:27+5:302024-12-09T12:13:24+5:30
साजिद नाडियाडवाला यांची सुपरहिट फ्रॅंचायझी असलेल्या 'बाघी' सिनेमाच्या चौथ्या भागाची अलिकडेच घोषणा करण्यात आली.
Baaghi 4: साजिद नाडियाडवाला यांची सुपरहिट फ्रॅंचायझी असलेल्या 'बाघी' सिनेमाच्या चौथ्या भागाची अलिकडेच घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या माध्यमातून टायगर श्रॉफ (Tiger Shroff) पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या फ्रॅंचाइझीचे पहिले तीन भार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे चौथा भागामध्ये वेगळं काय पाहायला मिळणार? याबद्दल चाहत्यांचीही उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
सोशल मीडियावर 'बागी-४' चित्रपटाची नवी पोस्टर इमेज समोर आली आहे. या नव्या पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटातील व्हिलनचा चेहरा रिव्हिल करण्यात आला आहे. मनोज वाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्यानंतर चित्रपटामध्ये खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त पाहायला मिळणार आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्तचा (Sanjay Dutt) खलनायिकी लूक पाहून अंगावर काटाच येईल.
संजय दत्त या पोस्टरमध्ये खूर्चीवर बसून ओरडताना दिसतो आहे. तसेच त्याच्या मांडीवर रत्कबंबाळ अवस्थेत असलेली एक मुलगी पाहायला मिळते आहे. तर संजय दत्तच्याही अंगावर रक्ताने माखलेला दिसतोय. 'हर आशिक एक विलेन है' असं या पोस्टवर लिहलं आहे. या पोस्टरवरून अभिनेता त्याच्या प्रेमाला गमावल्यानंतर खलनायक बनतो असा अंदाज प्रेक्षक लावला जात आहे. दरम्यान, येत्या ५ सप्टेंबर २०२५ मध्ये बागी-४ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येईल.
दरम्यान, अभिनेता संजय दत्तने सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. अभिनेत्याची पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.