दिव्या भारतीच्या निधनानंतर मानसिकरित्या खचले होते साजिद नाडियाडवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 06:15 PM2021-03-17T18:15:00+5:302021-03-17T18:22:26+5:30

दिव्याचे निधन झाले हे तिचा पती साजिद नाडियाडवालाला सहनच होत नव्हते.

sajid nadiadwala collapsed after divya bharti death | दिव्या भारतीच्या निधनानंतर मानसिकरित्या खचले होते साजिद नाडियाडवाला

दिव्या भारतीच्या निधनानंतर मानसिकरित्या खचले होते साजिद नाडियाडवाला

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्याचे निधन झाले हे तिचा पती साजिद नाडियाडवालाला सहनच होत नव्हते. तो खाली कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागला.

साजिद नाडियाडवालाने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. सलमान खान आणि साजिदने तर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. जुडवाँ, हर दिल जो प्यार करेगा, किक यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे.

साजिद नाडियाडवालाच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीसोबत साजिदचे लग्न झाले होते. दिव्याचे खूपच कमी वयात घरातील बाल्कनीतून प़़डून निधन झाले. दिव्याच्या निधनानंतर साजिदला चांगलाच धक्का बसला होता.

दिव्या भारतीच्या निधनानंतर स्टारडस्ट मासिकाचे पत्रकार ट्रॉय रिबेरियो यांनी एक लेख लिहिला होता. त्या दिवशी काय काय घडले हे सगळे त्यांनी त्यात नमूद केले होते. दिव्या, फॅशन डिझायनर नीता लुल्ला आणि तिचे पती डॉ. श्याम लुल्ला दिव्याच्या घरी होते. दिव्याने प्रचंड दारू प्यायली होती. तिच्या घराच्या बाल्कनीत बसायला तिला खूप आवडत असे. नेहमीप्रमाणेच ती बाल्कनीत बसली होती. पण दारूच्या नशेत असल्याने दिव्याचा तोल गेला आणि ती बाल्कनीतून खाली पडली.

दिव्याला लगेचच श्याम लुल्ला आणि दिव्याच्या बिल्डिंगमध्ये राहाणारे दिग्दर्शक व्ही. मेनन कूपर रुग्णालयात घेऊन गेले तर नीता आणि दिव्याच्या घरात काम करणारी बाई दिव्याच्या घरी ही गोष्ट सांगायला गेली. दिव्याचा जीव वाचवण्याचा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला. पण तिला वाचवण्यात अपयश आले. दिव्याची बातमी इंडस्ट्रीतील लोकांना कळल्यावर पंकज निहलानी पत्नी, मुलगा आणि निर्माते राजू मवानीसोबत तिथे आले. दिव्याच्या वडिलांची तब्येत तोपर्यंत पूर्णपणे ढासळली होती. त्यांना सायकॅट्रिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची काळजी पंकज घेत होते. 

दिव्याचे निधन झाले हे तिचा पती साजिद नाडियाडवालाला सहनच होत नव्हते. तो खाली कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना तो सतत सांगत होता की, तुम्ही काहीही करा... पण माझ्या पत्नीला परत आणा...

Web Title: sajid nadiadwala collapsed after divya bharti death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.