'या लग्नाशिवाय दुसरा विषयच नाही का'; विकी-कतरिनाच्या लग्नावर सलीम खान नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:16 AM2021-12-17T10:16:16+5:302021-12-17T10:16:57+5:30
Salim khan: अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तर, दुसरीकडे मात्र सलीम खान यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि कतरिना कैफ (katrina kaif) या दोघांचं नुकतंच लग्न झालं. राजस्थानमधील माधोपूर येथे राजेशाही थाटात या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघांचीच चर्चा रंगली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तर, दुसरीकडे मात्र सलमान खानचे (salman khan) वडील अर्थात लेखक सलीम खान (salim khan) यांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर विकी-कतरिनाची चर्चा सुरु असल्यामुळे अनेकदा अन्य सेलिब्रिटींना या लग्नाविषयी प्रश्न विचारले जात आहेत. यामध्येच सलीन खान यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे अनेक जण थक्क झाले आहेत. इतकंच नाही तर कतरिनाने विकीसोबत लग्न केल्यामुळे ते नाराज झालेत का? असा प्रश्नही नेटकरी उपस्थित करत आहेत.
सध्या सगळेच जण फक्त त्यांच्याच लग्नाविषयी बोलतायेत. मीडियाकडे विकी- कतरिनाच्या लग्नाशिवाय दुसरा विषयच नाहीये का?, अशी प्रतिक्रिया सलीम खान यांनी विकी-कतरिनाच्या लग्नावर दिली.
सलीम खान खरंच नाराज आहेत का?
सलीम खान यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. कतरिना सलमानची एक्स गर्लफ्रेंड असल्यामुळे या लग्नाविषयी प्रतिक्रिया देण्याचं सलीन खान यांनी टाळल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. यात अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी नाराजीही व्यक्त केली आहे.