कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलिम खान यांची झाली अशी अवस्था, सांगितला भयावह अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 14:21 IST2021-04-14T14:20:32+5:302021-04-14T14:21:15+5:30
Salman Khan's family even is not been able to resist Corona, सर्वसामान्य पासून ते सेलब्रिटी पर्यंत सारेच कोरोनाला त्रासले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलिम खान यांची झाली अशी अवस्था, सांगितला भयावह अनुभव
देशातील कोरोना रुग्णांची संख्या महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज १ लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आहे. कोरोना दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लॉकडाऊन हाच एक पर्याय असल्यामुळे पुन्हा एकदा गेल्यावर्षी प्रमाणे सारेच घरात बंदिस्त झालेत.कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे.
कोरोनाने साऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य पासून ते सेलब्रिटी पर्यंत सारेच कोरोनाला त्रासले आहेत.
अनेकांचे आयुष्यच कोरोनामुळे पालटले आहे.सध्या सलामन खानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनाही कोरोनामुळे चांगलीच धडकी भरली आहे.
घराच्या बाहेरही पडायला भीती वाटते, आयुष्यात अचानक नैराश्य आल्यारखे वाटते, जागोजागी तैनात झालेले पोलिस, प्रत्येकाच्या तोंडावर मास्क, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरही हसू गायब झालाय हे सगळ काही खूप भयानक आहे.
भयावह परिस्थिती पाहून एक वेगळीच भीती मनात भरलीय असे सलीम खान यांनी सांगितले. बाहेर सगळीकडेच नैराश्य पसरलंय. कोरोनाचा फक्त शरीरावरच नाही तर मनावरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनामुळं दैनंदिन आयुष्यच फार बदलून गेलंय. सर्वासाठी हा कठीण काळ आहे.