एका अटीवर सलमान खानने केली राखीच्या आईच्या उपचारासाठी मदत, वाचा काय आहे नेमके कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:35 AM2021-03-18T10:35:32+5:302021-03-18T10:43:26+5:30
Rakhi gets help from Salman Khan for Mom's treatment for this condition. बिग बॉस मधून राखी बाहेर आल्यावर सलमान ने राखीला आईच्या उपचाराचा सारा खर्च उचल्या चे तिने सांगितले होते.मात्र सलमानने राखीला मदत केल्याची गोष्ट गुपीतच ठेवायला सांगितली होती. सलमानने मदत केली असे बाहेर येऊ नये अशीच अत रखीकडे सलमानने ठेवली होती.
आई कॅन्सरशी झुंज देतेय. सध्या तिच्या आईवर किमोथेरपी सुरु आहे. बिगबॉस शो मधून बाहेर येताच राखीने आईचे फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. त्यानंतर हॉस्पिटल मधून राखीने आईचा एक व्हिडीओ श्ेअर केला होता. यात राखीची आई सलमान खानचे आभार मानताना दिसतेय.‘
'सलमानजी, थँक्यू बेटा. सोहलजी थँक्यू. सध्या किमो सुरु आहे. मी हॉस्पीटलमध्ये आहे. आज चौथा किमो झाला, आणखी दोन बाकी आहेत. यानंतर आॅपरेशन होईल. तुम्हाला परमेश्वर खूप यश देवो, तुम्हाला आनंद देवो,’असे राखीची आईने या व्हिडीओत म्हटले होते. बिग बॉस मधून राखी बाहेर आल्यावर सलमान ने राखीला आईच्या उपचाराचा सारा खर्च उचल्याचे तिने सांगितले होते.मात्र सलमानने राखीला मदत केल्याची गोष्ट गुपीतच ठेवायला सांगितली होती. सलमानने मदत केली असे बाहेर येऊ नये अशीच अट रखीकडे सलमानने ठेवली होती.
इतकेच काय जेव्हा राखीला कामाची गरज होती.कोणतेही काम राखी कडे नव्हते.तेव्हा राखीने सोहेल खानला मेसेज करून काम मागितले होते.बिग बॉस मध्ये जायचे असेही तिने सोहेललl सांगितले होते. सोहेलचा सांगण्यावरून राखीला बिग बॉसच्या घरात एन्ट्री मिळाली होती. कदाचित सोहेलभाईने सलमान भाईपर्यंत माझा मॅसेज पोहोचवला असावा, असे राखी म्हणाली होती.यावर राखीने सांगितले की, माझ्याकडे काम नव्हते काम मागण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही. माझ्या पडत्या काळात सलमान सोहेल भावाप्रमाणे माझा मदतीला धावून आले त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहे. मी सदैव त्यांची ऋणी राहील असे राखीने सांगितले.
राखी तू काळजी करु नकोस मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा कधी तुला मदत हवी असेल तेव्हा तू मला थेट फोन कर''. मी तुझ्या आईला भेटलेलो नाही. पण तुझी आई नक्कीच तुझ्यासारखी धाडसी आहे त्यामुळं इतक्या मोठ्या आजाराचा सामना करतानाही तिनं आपलं धैर्य गमावलेलं नाही. आई लवकर बरी होईल. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत.” अशा आशयाचा संदेश सोहेलनं राखीला दिला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.