कारागृहाबाहेर येताच सलमानने मागितल्या ‘या’ दोन वस्तू!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 01:14 PM2018-04-07T13:14:18+5:302018-04-07T18:44:18+5:30

काळवीट शिकार प्रकरणी सुपरस्टार सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवित पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यावेळी त्याची जोधपूर मध्यवर्ती ...

Salman asked for two things to come out of jail. | कारागृहाबाहेर येताच सलमानने मागितल्या ‘या’ दोन वस्तू!

कारागृहाबाहेर येताच सलमानने मागितल्या ‘या’ दोन वस्तू!

googlenewsNext
ळवीट शिकार प्रकरणी सुपरस्टार सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवित पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यावेळी त्याची जोधपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती. दरम्यान, दोन दिवस कारागृहात घालविल्यानंतर काही वेळापूर्वीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला काही अटींवर जामीन मंजूर करताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नसल्याचे स्पष्ट केले. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी ७ मे रोजी होणार असून, त्यासाठी सलमानला सत्र न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. 

दरम्यान, बॉलिवूडच्या भाईजानची जामिनावर सुटका होताच त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तत्पूर्वी कारागृहाबाहेर पडताच सलमानने सर्वात अगोदर मोबाइलची मागणी केली. त्यानंतर लगेचच त्याला गॉगल देण्यात आला. त्यानंतर तो कारमधून बसूून थेट जोधपूर विमानतळावर पोहोचला. जेव्हा सलमान बाहेर आला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी त्याच्या कारचा पाठलागही केला. त्यामुळे पोलिसांना काही चाहत्यांवर लाठीचार्ज करावा लागला. 

सुरुवातीला असे म्हटले जात होते की, सलमानची रात्री उशिरापर्यंत सुटका होण्याची शक्यता असल्याने तो आजची रात्र जोधपूरमध्येच काढणार आहे. कारण सलमानच्या बॉडीगार्डने तिकिटे उद्यासाठीचे बुक केली आहेत. त्यामुळे आज रात्री सलमान त्याच्या बहिणींसोबत जोधपूरमधील विवांता हॉटेलमध्ये थांबणार असल्याचे बोलले जात होते. त्याचबरोबर त्याचे खासगी विमानही जोधपूरलाच होते. अशात सलमानने जोधपूरला न थांबता थेट मुंबईला जाणे पसंत केले. 

सलमान खानच्या जामीन याचिकेवर सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरू झाली. यादरम्यान, सलमान खानचे वकील महेश बोरा आणि हस्तिमल सारस्वत यांनी कोर्टात सांगितले की, सलमान खान निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात फसविण्यात आले आहे. सलमान हा प्रत्येक सुनावणीदरम्यान हजर होता. त्याने जामिनाचा दुरु पयोग केला नाही, असेदेखील त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

Web Title: Salman asked for two things to come out of jail.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.