'या' अभिनेत्यामुळे सलमान झाला बॉडीबिल्डर; आज त्याच अभिनेत्याला मिळत नाहीये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 14:30 IST2023-06-30T14:29:57+5:302023-06-30T14:30:29+5:30
Salman khan: सलमानने सुरुवातीच्या काळात याच अभिनेत्याकडून फिटनेसचे धडे घेतले.

'या' अभिनेत्यामुळे सलमान झाला बॉडीबिल्डर; आज त्याच अभिनेत्याला मिळत नाहीये काम
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान (salman khan) उत्तम अभिनयासह त्याच्या फिटनेसमुळेही कायम चर्चेत येत असतो. आजच्या घडीला सलमानला फॉलो करणारे असंख्य तरुण आहेत. यात खासकरुन अनेक जण त्याच्याप्रमाणे फिटनेस, बॉडी मिळवण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे सलमानने वयाची ५५ वर्ष पार केली आहेत. मात्र, त्याचा फिटनेस एखाद्या २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच आहे. सलमानच्या बॉडीबिल्डिंगचे आज असंख्य चाहते आहेत.परंतु, ही बॉडी कमावण्यासाठी त्याने एका अभिनेत्याकडून धडे घेतल्याचं समोर आलं आहे.
टारझन या सिनेमातून रातोरात प्रकाशझोतात आलेला अभिनेता हेमंत बिरजे अनेकांना ठावूक असेल. उत्तम अभिनयासह फिटनेसमुळे या अभिनेत्याने तुफान लोकप्रियता मिळवली होती. विशेष म्हणजे याच अभिनेत्याकडून सलमानने सुरुवातीच्या काळात बॉडी बिल्डिंगचे धडे घेतले आहेत. 'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या मुलाखतीत हेमंत बिरजे यांनी हा खुलासा केला आहे.
"माझ्या फिटनेसमुळेच मला अनेक सिनेमे गमवावे लागले. पण, त्या काळात सलमान खान तासनतास माझ्यासमोर बसून रहायचा आणि माझ्याकडून बॉडी बिल्डिंगच्या टीप्स घ्यायचा. मात्र, या बॉडी बिल्डिंगमुळेच मला अनेक सिनेमांपासून दूर केलं गेलं", असं हेमंत बिरजे यांनी सांगितलं.
दरम्यान, टारझन हिट झाल्यानंतर हेमंतला १०७ सिनेमाच्या ऑफर्स मिळाल्या. मात्र, नंतर अनेक सिनेमांमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. सध्या हेमंत कलाविश्वापासून कोसोदूर गेले आहेत. इतकंच नाहीतर सोशल मीडियावरही त्यांचा फारसा वावर नाही.