Antim Teaser: 'अंतिम'मधील सलमान खान आणि आयुष शर्माचा जबरदस्त लूक व्हायरल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 16:09 IST2020-12-21T15:59:52+5:302020-12-21T16:09:42+5:30
टीजरमध्ये एका फाइट सीनचा भाग आहे ज्यात सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही शर्टलेस असून आपसात भिडताना दिसत आहेत.

Antim Teaser: 'अंतिम'मधील सलमान खान आणि आयुष शर्माचा जबरदस्त लूक व्हायरल....
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि आयुष शर्माचा आगामी 'अंतिम - द फायनल ट्रूथ' सिनेमा चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाचं शूटींग सुरू होऊन जास्त काळ लोटला नाही. अशात आता या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा टीजर व्हायरल झाला आहे. यातील खासकरून आयुष शर्माचा लूक पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.
टीजरमध्ये एका फाइट सीनचा भाग आहे ज्यात सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही शर्टलेस असून आपसात भिडताना दिसत आहेत. आयुष शर्मा पहिल्यांदा अशा बॉडी बिल्डर लूकमध्ये दिसत आहे. आयुष शर्माने 'लवयात्री' सिनेमातून डेब्यू केलं होतं. ज्यात तो एका चॉकलेट बॉयच्या भूमिकेत होता. पण त्याचा हा लूक अधिक भारी वाटत आहे.
अंतिम - द फायनल ट्रुथ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेय तर सिनेमा सलमान खान प्रॉडक्शनखाली तयार होत आहे. यात आयुष शर्माच्या अपोझिट महिमा मकवाना बॉलिवूड डेब्यू करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२१ मध्ये रिलीज होणार आहे.