धोका मिळाला, ब्रेकअप झालं, move on कसं करावं? सलमान खानने दिल्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:39 IST2025-02-09T12:38:39+5:302025-02-09T12:39:16+5:30

सलमान खानने पुतण्या अरहान खानला खास टीप्स दिल्या आहेत.

Salman Khan Advice To Arhaan Khan On Overcoming A Breakup | धोका मिळाला, ब्रेकअप झालं, move on कसं करावं? सलमान खानने दिल्या टीप्स

धोका मिळाला, ब्रेकअप झालं, move on कसं करावं? सलमान खानने दिल्या टीप्स

Salman Khan: बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखलं जातं. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सलमान खान नेहमीच चित्रपटांसोबत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचं नाव ऐश्वर्या राय, सोमी अली, कतरिना कैफ आणि इतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. पण, तरीही सलमान खान अजूनही अविवाहित आहे. तो अनेकदा नात्यांबद्दल बोलतोना दिसतो. अलिकडेच त्यानं पुतण्या अरहान खानला खास टीप्स दिल्या आहेत.

सलमान खानने अलीकडेच त्याचा पुतण्या अरहान खानच्या 'Dumb Biryani' या यूट्यूब चॅनलवर अनेक मुद्द्यावर भाष्य केलं.  यावेळी त्यानं पुतण्यासोबत आयुष्यातील अनुभव शेअर केले. तसेच नातेसंबंधांबद्दल सल्लाही दिला. सलमान म्हणाला, "जर कोणत्याही मुलीचे अरहानशी ब्रेकअप झाले तर अश्रू ढाळावेत आणि लवकर  move on करावं". सलमान यानं वर्णन जखमांवर 'बँड-एड' काढून टाकण्याप्रमाणे केलं. तो म्हणाला, "आपण जखमांवरील बँड-एड' हळूहळू नाही तर पटकन काढतो. त्याचप्रमाणे, एका खोलीत जा, खूप रडा आणि विषय संपवा"

सलमानच्या मते, ब्रेकअपनंतर, एखाद्याने काही काळ स्वतःच्या भावना अनुभवल्या पाहिजेत. परंतु बाहेरून सामान्य आणि अप्रभावित दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. "जर एखाद्या नात्यात फसवणूक झाली तर त्या नात्यातून ताबडतोब बाहेर पडण्याचे धाडस दाखवले पाहिजे", असं तो म्हणाला.  सलमान म्हटला,  "कधी चूक झाली तर ती कोणत्याही संकोचाशिवाय स्वीकारली पाहिजे आणि मनापासून माफी मागितली पाहिजे. तसेच "कोणत्याही अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी कोणत्याही अडचणीपासून मागे हटू नये".

 सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'सिकंदर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना देखील आहे. एआर मुरुगदास दिग्दर्शित हा चित्रपट आहे.  २०२५ मध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. ३० किंवा ३१ मार्च २०२५ ला सिनेमा रिलीज व्हायची शक्यता आहे. 

Web Title: Salman Khan Advice To Arhaan Khan On Overcoming A Breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.