सलमान खान, करण जोहर आणि आलिया भटचे सिनेमे बिहारमध्ये होणार बॅन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 14:26 IST2020-06-24T14:25:07+5:302020-06-24T14:26:11+5:30
सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सलमान खान, करण जोहर आणि आलिया भटचे सिनेमे बिहारमध्ये होणार बॅन ?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांत एक प्रतिभावान कलाकार होता. त्याची अशी अचानक एक्झिट चटका लावणारी आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. सुशांतच्या कुटुंबीयांचा, कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह जवळच्या मित्र-मैत्रिणींचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे.
सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला आहे.हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार पाटण्यामधील लोक करण जोहर, आलिया भट आणि सलमान खान यांच्या चित्रपटांवर राज्यात बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान आणि करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून या दोघांवर टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे.
ऐवढेच नाही तर बॉलिवुडमधील माफियांविरोधात आवाज उठू लागला. सुशांतचा मृत्यू नाही हत्या असल्याचे आरोप अभिनेत्री कंगना राणौतसह मोठमोठ्या दिग्दर्शकांनी केले. यामध्ये सलमान खान, करम जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी यांची नावे येऊ लागली. बिहारमध्ये एका वकीलाने तर त्यांच्याविरोधात खटलाच दाखल केला.