या कारणामुळे सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं झालं नाही लग्न, अरबाज खाननं केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:36 IST2025-03-31T14:35:33+5:302025-03-31T14:36:56+5:30

Salman Khan and Aishwarya Rai : सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक होते. नव्वदच्या दशकात या दोघांनी आपल्या लव्हस्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Salman Khan and Aishwarya Rai did not get married due to this reason, Arbaaz Khan had revealed | या कारणामुळे सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं झालं नाही लग्न, अरबाज खाननं केला होता खुलासा

या कारणामुळे सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं झालं नाही लग्न, अरबाज खाननं केला होता खुलासा

सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हे एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक होते. नव्वदच्या दशकात या दोघांनी आपल्या लव्हस्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हे दोघे लवकरच लग्न करतील असे चाहत्यांना वाटू लागले होते पण अचानक त्यांच्या नात्यात असे काही घडले आणि ते कायमचे वेगळे झाले. अरबाज खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सलमान-ऐश्वर्याने लग्न न करण्यामागचे कारण सांगितले होते.

ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध होती. ती एक यशस्वी मॉडेल होती आणि तिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले होते. ऐश्वर्या आणि सलमानने हम दिल दे चुके सनममध्ये एकत्र काम केले होते आणि इथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात वेडापीसा झाला होता. त्याला तिच्यासोबत सेटल व्हायचं होतं पण ऐश्वर्याला तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं आणि ती लग्नासाठी तयार नव्हती. त्यामुळे त्यांच्या नात्यात कडवटपणा येऊ लागला. कारण सलमानला त्यांच्या नात्याला नाव द्यायचे होते.

हे होते खरे कारण 
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, अरबाज खानने सांगितले होते की, सलमानच्या वागण्यामुळे ऐश्वर्या राय वैतागल्याचे दिसून येत होते. तो शॉर्ट टेम्पर्ड झाला होता आणि त्याचा राग नियंत्रणाबाहेर गेला होता. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने ऐश्वर्या शूटिंग करत असलेल्या एका चित्रपटाच्या सेटवर जाऊन गोंधळ घातला होता. त्यानंतर तिला प्रोजेक्टमधून काढून टाकण्यात आले होते.

ऐश्वर्याच्या वडिलांना त्यांचे नाते नव्हते मान्य 
रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रायचे वडिलांना सलमान खानसोबतचे नाते आवडत नव्हते. सलमानच्या कॅसानोव्हा इमेजमुळे ते नाराज होते. ऐश्वर्याचे वडील आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल चिंतेत होते आणि त्यांनी सलमानला तिच्यासाठी योग्य जोडीदार मानले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या सलमानच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम व्यतित करत होती पण ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. त्यामुळे सलमानला राग आला आणि दोघेही नेहमी भांडायचे. शेवटी त्यांचे नाते कायमचे संपुष्ठात आले.

Web Title: Salman Khan and Aishwarya Rai did not get married due to this reason, Arbaaz Khan had revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.