अरबाजनंतर आता सोहेलही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार ? मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:33 PM2024-09-10T12:33:21+5:302024-09-10T12:35:03+5:30

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोहेल खानचीच चर्चा आहे.

Salman khan and Arbaaz Khan brother sohail khan spotted with mystery girl in city video went viral on social media | अरबाजनंतर आता सोहेलही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार ? मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो व्हायरल

अरबाजनंतर आता सोहेलही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार ? मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो व्हायरल

Sohail Khan : बॉलिवूडमध्ये दबदबा असलेल्या खान कुटुंबात पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वीच अभिनेता अरबाज खान हा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. आता अरबाजनंतर त्याचा लहान भाऊ सोहल खानदेखील दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे. नुकतंच सोहेल खान हा पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. नुकतंच तो मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेट गेल्याच पाहायला मिळालं. 

सलमान खानचा भाऊ सोहेलने पत्नी सीमाकडून २४ वर्षांच्या संसारानंतर २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. १९९८ मध्ये सोहेल आणि सीमा यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र, तरीही त्यांचं नातं तुटलं. आता घटस्फोट झाल्यावर पुन्हा एकदा सोहलच्या आयुष्यात प्रेम आलं आहे. मिस्ट्री गर्लसोबतचे (Sohail Khan With His Rumoured Girlfriend ) सोहेल स्पॉट झाला.  ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, यावर सोहेल किंवा त्यांच्या जवळच्या मित्रांकडून किंवा कुटुंबाकडून यावर दुजोरा दिलेला नाही. 


 सोहेल खान आणि सीमा यांच्यात नेमकं कुठे बिनसलं याचा खुलासा खुद्द सीमा सजदेहने केला होता. सीमा सजदेहने एका चॅनलला मुलाखत दिली होती. यावेळी ती घटस्फोटाचं कारण सांगत म्हणाली, "अनेकांना वाटतं की एक्सट्रा मॅरिटल अफेअरमुळेच आमचा घटस्फोट झाला. पण तसं नाहीये. जेव्हा तुम्ही लग्नात एकमेकांसोबत आनंदी नसता, तुमच्यात सतत भांडणंच होत असतात तेव्हा मुलांवर याचा खूप वाईट परिणाम होत असतो. यातून आपण आपल्या मुलांचं किती नुकसान करत असतो हे कळतच नाही. म्हणून मी आणि सोहेलने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोट घेण्याच्या आधीपासूनच आम्ही एकत्र न राहता वेगवेगळे राहत होतो".
 

Web Title: Salman khan and Arbaaz Khan brother sohail khan spotted with mystery girl in city video went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.