प्रतीक्षा संपली! ईदला रिलीज होणार सलमान खान- कतरिना कैफचा 'टायगर 3'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 01:52 PM2022-03-04T13:52:56+5:302022-03-04T15:11:40+5:30

'टायगर 3' चा पहिला टीझर यशराजने रिलीज केला आहे. टीझरमध्ये कतरिना कैफ जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे.

salman khan and katrina kaif film tiger3 will release in cinemas on 21st april eid | प्रतीक्षा संपली! ईदला रिलीज होणार सलमान खान- कतरिना कैफचा 'टायगर 3'

प्रतीक्षा संपली! ईदला रिलीज होणार सलमान खान- कतरिना कैफचा 'टायगर 3'

googlenewsNext

शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाल्यापासून चाहते सलमान खानच्या 'टायगर 3'च्या घोषणेची वाट पाहत आहेत. गुरुवारी यशराज फिल्म्सने व्हिडिओ रिलीज करून सलमान खान आणि कतरिना कैफच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली. अधिकृत माहितीनुसार, हा चित्रपट 21 एप्रिल 2023 म्हणजेच पुढच्या वर्षी ईदला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'टायगर 3' चा पहिला टीझर यशराजने रिलीज केला आहे. टीझरमध्ये कतरिना कैफ जबरदस्त  अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. शेवटी कतरिना कैफ सलमान खानला विचारते, 'तू तयार आहेस का' जोपर्यंत भाईजान म्हणत नाही, 'टायगर नेहमीच तयार आहे'. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होणार आहे. 

विशेष म्हणजे 'टायगर 3' हा सलमान आणि कतरिनाच्या अॅक्शन चित्रपटांच्या सिरीजचा तिसरा भाग आहे. याचे दिग्दर्शन मनीष शर्माने केलं आहे. चित्रपटात सलमान खानने भारतीय गुप्तहेर अविनाश सिंग 'टायगर' राठौरची भूमिका साकारली आहे, जो पाकिस्तानी गुप्तहेर झोया हुमैमी (कतरिना) च्या प्रेमात पडतो.  चित्रपटाचे शूटिंग नुकतेच दिल्ली आणि आसपास पूर्ण झाले आहे.

याआधी सलमान आणि कतरिनाने तुर्की, रशिया आणि ऑस्ट्रियामध्येही चित्रपटाचे शूटिंग केले होते. यात इमरान हाश्मीचीही भूमिका आहे. 'एक था टायगर'   चित्रपट 2012 मध्ये आला होता आणि कबीर खानने दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला. दुसरा चित्रपट 'टायगर जिंदा है' 2017 मध्ये रिलीज झाला होता आणि अली अब्बास जफरने त्याचे दिग्दर्शन केले होते. या फ्रँचायझीच्या दोन्ही भागांमध्ये सलमान आणि कतरिनाने काम केले आहे.


 

Web Title: salman khan and katrina kaif film tiger3 will release in cinemas on 21st april eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.