टीझर नाही तर 'टायगरचा मॅसेज'; कतरिना अन् सलमानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:55 PM2023-09-25T14:55:55+5:302023-09-25T15:02:45+5:30
'टायगर 3' चा एक व्हिडीओ 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्याला 'टायगरचा मॅसेज' असे म्हटले जात आहे.
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच टायगर-3 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता 'टायगर 3'शी संबंधित एक व्हिडीओ 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्याला 'टायगरचा मॅसेज' असे म्हटले जात आहे.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि यशराज फिल्म्सचे संस्थापक यश चोप्रा यांचा 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. म्हणून या खास दिवशी 'टायगरचा मॅसेज' रिलीज करण्यात येणार आहे. हा एक प्रकारचा टीझर असेल, फक्त याला नाव वेगळे ठेवण्यात आले आहे. यात 'टायगर 3' ची झलक पाहायला मिळेल.
आदित्य चोप्रा आजपासून 'टायगर 3' च्या प्रमोशनल कॅम्पेनला सुरुवात करणार आहे. कारण त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघा दीड महिना उरणार आहे. पिंकविलामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सर्वात आधी 'टायगरचा मेसेज' नावाचा व्हिडिओ येईल. यामध्ये जनतेला पहिल्यांदाच 'टायगर 3' च्या दुनियेत येण्याची संधी मिळणार आहे.
#YRF to reveal #Tiger3 Message on September 27#SalmanKhan#TigerKaMessage#TigerKaMessageSept27#KatrinaKaifpic.twitter.com/NX4wxqc9pb
— Narinder Saini (@Narinder75) September 25, 2023
'टायगर्स मॅसेज' नावाच्या या व्हिडिओमध्ये सलमान एजंट टायगरच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्हिडिओमध्ये तो एक महत्त्वाचा मॅसेज देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तो संदेश काय आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या व्हिडिओनंतर चित्रपटाचा ट्रेलर थेट समोर येईल. यासोबत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर होण्याची शक्यता आहे.
'टायगर 3' हा YRF spy universe अंतर्गत बनवला जाणारा पाचवा चित्रपट आहे. याशिवाय, हा या फ्रेंचाइजीचा सर्वात महागडा चित्रपट आहे. 300 ते 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात येतोय. 'टायगर 3'मध्ये सलमान खानसोबतकतरिना कैफ, इमरान हाश्मी, रेवती, रिद्धी डोग्रा आणि रणवीर शौरी हे कलाकार दिसणार आहेत. शाहरुख खानही या चित्रपटात 'पठाण'च्या भूमिकेत कॅमिओ करणार आहे. 'बँड बाजा बारात' आणि 'फॅन' सारखे चित्रपट बनवणाऱ्या मनीष शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा है या चित्रपटांप्रमाणेच टायगर-3 ला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच कळेल.