ब्रेकअप के बाद! नात तुटल्यावर अशी झाली होती सलमान आणि कतरिनाची अवस्था, मोठ्या दिग्दर्शकाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:37 PM2024-03-07T12:37:18+5:302024-03-07T12:40:00+5:30

ब्रेकअपनंतर दोघांची काय अवस्था झाली होती, याचा खुलासा एका दिग्दर्शकाने केला आहे.

Salman Khan and Katrina Kaif weren't comfortable post-breakup during casting of Ek Tha Tiger, reveals Kabir Khan | ब्रेकअप के बाद! नात तुटल्यावर अशी झाली होती सलमान आणि कतरिनाची अवस्था, मोठ्या दिग्दर्शकाने केला खुलासा

ब्रेकअप के बाद! नात तुटल्यावर अशी झाली होती सलमान आणि कतरिनाची अवस्था, मोठ्या दिग्दर्शकाने केला खुलासा

सलमान खान आणि कतरिना कैफ यांचं अफेअर आणि ब्रेकअप एकेकाळी बॉलिवूड वर्तुळात चर्चेत राहिलं.  दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती.  ब्रेकअपनंतरही कतरिना आणि सलमाननं एकत्र काम करणं सुरूच ठेवलं आणि अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. मात्र, आता नुकतेच ब्रेकअपनंतर दोघांची काय अवस्था झाली होती, याचा खुलासा एका दिग्दर्शकाने केला आहे.


अलीकडेच दिग्दर्शक कबीर खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या मॅशेबल इंडिया या नवीन पॉडकास्टमध्ये 'एक था टायगर'मध्ये कतरिना आणि सलमानला एकत्र कास्ट करण्याबद्दल खुलासा केला. ब्रेकअपमुळे अभिनेत्री सलमान खानसोबत काम करण्यास कम्फर्टेबल नसल्याचेही त्यानं सांगितलं. कबीर म्हणाला, "कतरिनाला सिनेमसाठी आधीच साइन करण्यात आलं होतं. चित्रपटात तिची झोयाची व्यक्तिरेखा होती आणि मग आम्ही सलमान खानकडे गेलो. हा तो टप्पा होता जिथं त्यांचं ब्रेकअप झालं होतं. पण, असं असूनही या दोघांनी चित्रपटात उत्तम काम केलं आणि सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले'.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि कतरिनाने 2005 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. पण, 2010 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाने रणबीर कपूरला डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, कतरिनाचे रणबीर कपूरचेही नाते जास्त काळ टिकू शकले नाही. यातच  कतरिनाच्या आयुष्यात विकी कौशलची एन्ट्री झाली.  काही वर्ष डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने 2022 मध्ये लग्न केलं.

सलमान खान आणि कतरिना कैफने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी 'मैने प्यार क्यूं किया', 'पार्टनर', 'हॅलो', 'युवराज', 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'भारत' आणि 'टायगर 3' मध्ये एकत्र काम केले आहे. चाहत्यांना सलमान आणि कतरिना कैफची जोडी खूप आवडते. दोघांचे सिनेमे ब्लॉबास्टर ठरले आहेत. आजही दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
 

Web Title: Salman Khan and Katrina Kaif weren't comfortable post-breakup during casting of Ek Tha Tiger, reveals Kabir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.