बॉक्स ऑफिसवर सलमानच्या 'सिकंदर'ची जादू चालेना; पाचव्या दिवशी कमाईत मोठी घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:37 IST2025-04-04T11:32:40+5:302025-04-04T11:37:42+5:30
'सिकंदर' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

बॉक्स ऑफिसवर सलमानच्या 'सिकंदर'ची जादू चालेना; पाचव्या दिवशी कमाईत मोठी घट
Sikandar Collection Day 5: सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भू्मिका असेलल्या 'सिकंदर' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. 'बजरंगी भाईजान' आणि 'सुल्तान' या चित्रपटानंतर बॉलिवूडच भाईजानने जवळपास दीड वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. ३० मार्चला ईदचं औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या पहिल्या काही दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु, सिकंदरच्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये घट पाहायला मिळाली. त्यामुळे पाचव्या दिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण, हा आलेख आता पूर्णपणे बदलला आहे.
दरम्यान, सलमान खानच्या 'सिकंदर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू काही चालताना दिसत नाही. सिनेमाने पाचव्या दिवशी १० कोटी देखील कलेक्शन केलं नाही. 'सिकंदर'कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिकंदर सिनेमाने पाचव्या दिवशी फक्त ५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने ९० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे.
सिकंदर' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ए. आर. मुरुगोदास यांनी सांभाळली आहे. तर २०० कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमात सलमान, रश्मिकासह सत्यराज, काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन अशी स्टारकास्ट आहे.