ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:47 IST2025-03-04T16:46:23+5:302025-03-04T16:47:24+5:30
सलमानच्या अफलातून डान्स स्टेप्स, 'सिकंदर'मधलं गाणं पाहिलं का?

ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज
Sikandar first song Zohra Jabeen: सलमान खानचा (Salman Khan) आगामी 'सिकंदर' सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर्षी ईदच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीझर आला. टीझर पाहून चाहत्यांनी सलमान खानचं हे दमदार कमबॅक असणार अशीच भविष्यवाणी केली. सलमानचा यामध्ये पॉवरफुल अॅक्शन अवतार दिसत आहे. तर दुसरीकडे रश्मिका मंदानासोबत (Rashmika Mandanna) त्याला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. दरम्यान आता नुकतंच सिनेमाचं पहिलं गाणं 'जोहरा जबीं' रिलीज झालं आहे.
'सिकंदर' सिनेमातील पहिलं गाणं 'जोहरा जबीं' मध्ये रश्मिका मंदाना आणि सलमान खानची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. सलमानच्या हुकस्टेप्सही गाण्यात आहे. दोघंही ब्लॅक आऊटफिटमध्ये कमाल दिसत आहेत. सलमान ३१ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत गाण्यात धमाल नाचताना दिसत आहे. सिनेमात प्रितम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.
या व्हिडिओ साँगवर नेटकऱ्यांनी आणि सलमानच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'गाणं सुपरहिट आहे', 'रश्मिका भाईजानची जोडी कमाल', 'भाईजान इज बॅक' अशा कमेंट्स आल्या आहेत. काही वेळातच गाण्याला लाखो व्ह्यूज आले आहेत.
सलमान खान आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच बिग स्क्रीनवर एकत्र दिसणार आहे. सिनेमात रश्मिका टिपिकल बॉलिवूड हिरोईन आहे अशी माहिती तिनेच एका मुलाखतीत दिली होती. तर सलमान खान पुन्हा त्याच्या आधीसारखंच त्याच्या अॅक्शन अवतारात आला आहे. साजिद नाडियादवाला यांनी सिनेमाची निर्मिती केली असून ए. आर. मुरुगदास यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. २८ मार्च रोजी सिनेमा प्रदर्शित होत आहे.