सलमान, शाहरुख अन् आमिर! इफ्तार पार्टीत तीन खान एकत्र, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:42 IST2025-03-13T11:42:00+5:302025-03-13T11:42:15+5:30

रमजानच्या महिन्यात सलमान, शाहरुख आणि आमिर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. आमिरच्या घरी सलमान आणि शाहरुख गेले होते. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

salman khan and shah rukh khan joins aamir khan iftar party at his home video viral | सलमान, शाहरुख अन् आमिर! इफ्तार पार्टीत तीन खान एकत्र, व्हिडिओ व्हायरल

सलमान, शाहरुख अन् आमिर! इफ्तार पार्टीत तीन खान एकत्र, व्हिडिओ व्हायरल

सलमान, शाहरुख आणि आमिर हे बॉलिवूडचे सुपस्टार आहेत. पण, फार कमी वेळा हे तीनही खान एकत्र दिसतात. या तिघांना एकत्र बघण्याचा योग क्वचितच येतो. आता रमजानच्या महिन्यात सलमान, शाहरुख आणि आमिर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. आमिरच्या घरी सलमान आणि शाहरुख गेले होते. याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्रामवरुन पेजवरुन आमिरच्या घराबाहेरचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आमिरसोबत सलमान खान दिसत आहे. आमिरच्या घरी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने सलमान आणि शाहरुख त्याच्या घरी गेले होते. सलमान, शाहरुख आणि आमिरला एकत्र पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


दरम्यान, आमिर खान शुक्रवारी(१४ मार्च) त्याचा ६०वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. आमिर खानच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. आमिर खान हा बॉलिवूडमधला सुपरस्टार आहे. त्याने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. मात्र लाल सिंग चड्ढा सिनेमाच्या अपयशानंतर तो मोठ्या पडद्यापासून सध्या दूर आहे. तो बॉलिवूडमधून रिटायरमेंट घेणार असल्याच्याही चर्चा आहेत. 

Web Title: salman khan and shah rukh khan joins aamir khan iftar party at his home video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.