बिश्नोईच्या धमक्यांदरम्यान भाईजानचं चाहत्यांना सरप्राइज, २९ वर्षांनी सलमान-शाहरुखचा 'करण अर्जुन' पुन्हा प्रदर्शित होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:50 IST2024-10-28T13:49:48+5:302024-10-28T13:50:13+5:30
बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमानचे चाहतेही चिंतेत आहेत. अशातच भाईजानने चाहत्यांना एक खूश खबर दिली आहे. सलमानचा 'करण अर्जुन' सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

बिश्नोईच्या धमक्यांदरम्यान भाईजानचं चाहत्यांना सरप्राइज, २९ वर्षांनी सलमान-शाहरुखचा 'करण अर्जुन' पुन्हा प्रदर्शित होणार
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला वारंवार लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमक्या येत आहेत. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षितेतही वाढ करण्यात आली आहे. बिश्नोईच्या धमक्यांमुळे सलमानचे चाहतेही चिंतेत आहेत. अशातच भाईजानने चाहत्यांना एक खूश खबर दिली आहे. सलमानचा 'करण अर्जुन' सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
१९९५ साली प्रदर्शित झालेला 'करण अर्जुन' सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात सलमान खान आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. तर राखी गुलजार, ममता कुलकर्णी आणि काजोल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. राकेश रोशन यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या सिनेमातील डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर जुने सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड आला आहे. अशातच सलमानचा 'करण अर्जुन' सिनेमादेखील पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सलमानने सिनेमाचा प्रोमो शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. २२ नोव्हेंबरला सलमान-शाहरुखचा 'करण अर्जुन' थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. भाईजानने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. करण अर्जुन पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत.