सोहेलच्या बर्थडे पार्टीत पापाराझींवर भडकला सलमान, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, "त्याने गाडी चालवली तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:33 IST2023-12-20T13:31:49+5:302023-12-20T13:33:04+5:30
या व्हिडिओत सलमान पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे. या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोहेलच्या बर्थडे पार्टीत पापाराझींवर भडकला सलमान, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, "त्याने गाडी चालवली तर..."
बॉलिवूडचा भाईजान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सलमानने नुकतीच छोटा भाऊ सोहेल खानच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. यादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सलमान पापाराझींवर भडकल्याचं दिसत आहे. या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोहेल खानने नुकताच त्याचा ५३वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या बर्थडे पार्टीला खान कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. सलमानबरोबर सलीम खान, सलमा खान, हेलेन, अर्पिता खान, आयुष शर्मा सोहेलला शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. पार्टी संपल्यानंतर सलमान त्याच्या आईवडिलांबरोबर घरी जाण्यासाठी निघाला. तेव्हा पापाराझींनी त्याच्या कारच्या भोवती फोटोसाठी गर्दी केली होती. ते पाहून सलमानचा राग अनावर झाला. आणि त्याने पापाराझींना दम भरला. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम चॅनेलवरुन याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओत सलमान पापाराझींना डोळे मोठे करून दाखवताना दिसत आहे. त्याबरोबरच "सगळे पाठीमागे व्हा" असंही तो म्हणत आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "बाजूला व्हा नाहीतर मी गाडी चालवेन", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "ऐश्वर्यामुळे सलमानभाई टेन्शनमध्ये आहे," अशी कमेंट केली आहे. "अरे सांभाळून नाहीतर तो गाडी चालवेल", असं म्हणत सलमानला ट्रोल केलं आहे.
तर काहींनी आईवडिलांबरोबर असल्याने भाईजानने असं केलं म्हणत सलमानचं कौतुक केलं आहे. दरम्यान, सलमान 'टायगर ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई केली नाही.