VIDEO : NCP नेत्याच्या मुलाच्या लग्नात सलमान खानचा धमाकेदार; अनिल कपूर, शिल्पा शेट्टीनेही दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 18:16 IST2021-12-20T18:13:29+5:302021-12-20T18:16:24+5:30
Salman Khan Dance at Prafulla Patel's Son : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात सलमान खानसोबत अनिल कपूर, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हेही स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

VIDEO : NCP नेत्याच्या मुलाच्या लग्नात सलमान खानचा धमाकेदार; अनिल कपूर, शिल्पा शेट्टीनेही दिली साथ
अभिनेता सलमान खान(Salman Khan) नुकताच परदेशातून 'दंबग' टूर करून आला. त्यानंतर आता त्याचा एका लग्नातील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात सलमान खानसोबतअनिल कपूर, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हेही स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.
जयपूरमध्ये पार पडलेल्या या राजेशाही लग्नात सलमान खान, अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टी हे 'जुम्मे की रात' या गाण्यावर थिरकताना दिसले. यावेळी पटेल परिवारातील लोक त्यांना साथ देत होते. या हाय प्रोफाइल लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
बॉलिवूड कलाकार अनेक मोठ्या लग्नांमध्ये डान्स करताना दिसतात. असाच सलमान याआधी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नातही डान्स करताना दिसला होता. तेव्हाही त्याचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. आताही त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर सलमान खान आता त्याच्या 'टायगर जिंदा है'सीरीजच्या पुढील सिनेमाचं शूटींग करण्यासाठी तयार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत नुकतंच लग्न झालेली अभिनेत्री कतरिना कैफ-कौशल दिसणार आहे. तर दुसरीके अनिल कपूर हे नीतू कपूर, वरूण धवन आणि कियाला अडवाणीसोबत आगामी 'जुग जुग जीयो'चं शूटींग करत आहेत.