‘कमिटमेंट’चा पक्का सलमान खान यावेळी चुकला; म्हणाला, माफी मागतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:08 PM2021-05-11T12:08:02+5:302021-05-11T12:12:08+5:30

Salman Khan apologizes: भाईजान निराश...!  पडद्यावर भाईजान कमिटमेंटचा पक्का आहे. रिअल लाईफमध्येही तो दिलेला शब्द तंतोतंत पाळतो. पण यावेळी मनात असूनही भाईजान ‘कमिटमेंट’ पूर्ण करू शकला नाही.

Salman Khan apologizes to cinemas owners, says – Radhe’s box office collection will be zero | ‘कमिटमेंट’चा पक्का सलमान खान यावेळी चुकला; म्हणाला, माफी मागतो...

‘कमिटमेंट’चा पक्का सलमान खान यावेळी चुकला; म्हणाला, माफी मागतो...

googlenewsNext
ठळक मुद्देआम्ही कमवणार नाही तर गमावणार आहोत. पण याचे दु:ख नाही. कारण लोकांची, चाहत्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असेही भाईजान म्हणाला.

‘एकबार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनें आप की भी नहीं सुनता...’, हा डायलॉग आठवला की, फक्त भाईजान सलमान खान आणि सलमान खान (Salman Khan) याचाच चेहरा डोळ्यांसमोर येतो. पडद्यावर भाईजान कमिटमेंटचा पक्का आहे. रिअल लाईफमध्येही तो दिलेला शब्द तंतोतंत पाळतो. पण यावेळी मनात असूनही भाईजान ‘कमिटमेंट’ पूर्ण करू शकला नाही. मग काय तर, भाईजानने मोठ्या मनाने थिएटर मालकांची माफी मागितली.
हो, सलमान खानचा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe: Your Most Wanted Bhai) हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर म्हणजे13 मे रोजी थिएटर्स व ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची कमिटमेंट भाईजानने केली होती. पण देशात कोरोनामुळे थिएटर्स बंद आहेत. अशात राधे चित्रपटगृहांत रिलीज होणार नाहीच. सलमानला याचे दु:ख आहे आणि म्हणून त्याने थिएटर्स मालकांची माफी मागितली आहे. बॉक्स ऑफिसवर राधेची कमाई झिरो असणार आहे. मी यासाठी माफी मागतो, असे सलमान म्हणाला.

सोमवारी संध्याकाळी व्हिडीओ कॉलवर सलमानने मीडियाशी संवाद साधला. यावेळी सलमानने चित्रपटगृहांच्या मालकांची (Theatre Owners) माफी मागितली.
 तो म्हणाला, ‘मी चित्रपटगृहांच्या मालकांची माफी मागू इच्छितो. राधे थिएटर्समध्ये रिलीज होईल आणि थिएटर्स मालक यातून काहीप्रमाणात नफा मिळवतील, अशी अपेक्षा होती. आम्ही आत्तापर्यंत प्रतीक्षा केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा केली. महामारी संपेल आणि आम्ही आमचा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज करू शकू, हा विश्वास होता. पण असे काहीही झालेले नाही. आता सर्वकाळी कधी सुरळीत होईल, माहित नाही.’

 चाहते निराश आहेत, पण...
चाहते मला मोठ्या पडद्यावर पाहू इच्छितात, मला माहित आहे. पण कोरोनामुळे राधे चित्रपटगृहांत रिलीज होऊ शकणार नाही. चाहते निराश आहेत. काही चाहत्यांनी संपूर्ण ऑडिटोरिम बुक केले होते. मात्र मी या गोष्टीला प्रोत्साहन देणार नाही. सलमानचा सिनेमा पाहायला गेलो आणि कोरोना झाला, असे लोकांनी म्हणावे, असे मला वाटत नाही, असेही सलमान यावेळी म्हणाला.

घरी बसून पाहा...
कोरोना काळात मी लोकांना एंटरटेन करू इच्छितो. चाहते घरी बसून स्वस्तात माझा सिनेमा पाहू शकतील. झी प्लेक्स व दुस-या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘पे पर व्ह्यू’ तत्त्वावर हा सिनेमा रिलीज होतोय, असे सलमान म्हणाला.

कमवणार नाही तर गमावणार आहोत...
सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज झाल्यास 100, 200, 300 कोटी कमावतो. पण थिएटर्समध्ये रिलीज न झाल्यास आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे ‘राधे’मुळेही आम्हाला प्रचंड मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आम्ही कमवणार नाही तर गमावणार आहोत. पण याचे दु:ख नाही. कारण लोकांची, चाहत्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असेही भाईजान म्हणाला.

Web Title: Salman Khan apologizes to cinemas owners, says – Radhe’s box office collection will be zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.