अरबाजच्या सट्टा लावण्याच्या सवयीमुळे सलमान खानला झाला राग अनावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2018 03:48 PM2018-06-02T15:48:49+5:302018-06-02T21:18:49+5:30
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अरबाज खानची आयपीएल बेटिंग प्रकरणी ठाणे पोलिसांनी कसून चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजने ...
ब लिवूडचा दबंग सलमान खानचा भाऊ अरबाज खानची आयपीएल बेटिंग प्रकरणी ठाणे पोलिसांनी कसून चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजने चौकशीदरम्यान, आयपीएलमध्ये बेटिंग केल्याची कबुली दिली. सट्टेबाजीमुळे मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. माझ्यावरची उधारी वाढत गेली, सट्टा जिंकून मला उधारी फेडायची होती, पण मला त्यातही अपयशाचाच सामना करावा लागला, आदी माहिती अरबाजने चौकशीदरम्यान सांगितली. अरबाजच्या या सवयीने त्याचे व्यक्तिगत आयुष्य उद्ध्वस्त झालेच शिवाय त्याचे वैवाहिक जीवनही दुभंगले. कारण अरबाज मलाइकाच्या घटस्फोटाला बेटिंगच जबाबदार असल्याची माहिती आता समोर येत आहे. अरबाजच्या या सवयीमुळे सलमान खानही त्याच्यावर चांगलाच संतापला होता. त्यावेळी दोघांचे भांडण इतके विकोपाला गेले होते की, कुटुंबाला त्यामध्ये मध्यस्थी करावी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजच्या सट्टा लावण्याच्या सवयीमुळे सलमान चांगलाच वैतागला होता. सलमानने अनेकवेळा त्याला यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण अरबाजने त्याचे ऐकले नाही. त्याचबरोबर तो सट्टेबाजीत असा काही अडकला की त्याच्यावर दिवसेंदिवस उधारी वाढत गेली. रक्कम वाढत गेल्याने बुकी त्याला सातत्याने फोन करायचे, काहींनी तर त्याला धमक्याही दिल्या. नंतर अरबाजने बुकीच्या फोनला रिप्लाय देणे बंद केले. त्यामुळे बुकी मलाइकाला फोन करू लागले. त्यामुळे मलाइका आणि अरबाजमधील भांडणे वाढायला लागली. जेव्हा ही बाब सलमानला कळाली तेव्हा त्याचा राग अनावर झाला. तो अरबाजच्या श्रीमुखात भडकाविण्यासाठी पुढे सरसावला होता, पण कुटुंबातील सदस्यांनी मध्यस्थी करीत दोघां भावांमधील वाद मिटविला.
दरम्यान, आता हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले असून, अरबाज त्यात चांगलाच गोवताना दिसत आहे. पोलिसांनी जेव्हा अरबाजची कसून चौकशी केली तेव्हा त्याने सट्टा लावल्याची कबुली दिली. चौकशी सुरू असताना मुख्य संशयित बुकी सोनू जलान आणि अरबाज खान यांना समोरासमोर बसवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार दोघांना सात मिनिटे समोरासमोर ठेवून चौकशी करण्यात आली. यावेळी अरबाजने सट्टा लावल्याचे मान्य केले.