SO CUTE : 16 लाख लोकांनी पाहिला सलमान खानचा हा व्हिडीओ, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 11:23 AM2020-03-08T11:23:58+5:302020-03-08T11:25:15+5:30

हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे

salman khan caress her niece ayat video viral on social media-ram | SO CUTE : 16 लाख लोकांनी पाहिला सलमान खानचा हा व्हिडीओ, एकदा पाहाच

SO CUTE : 16 लाख लोकांनी पाहिला सलमान खानचा हा व्हिडीओ, एकदा पाहाच

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर तो लवकरच ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. काही तासांत 16 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला, यावरून तुम्ही कल्पना करू शकता. या व्हिडीओत काय खास आहे तर, यात भाईजान त्याची भाची आयतसोबत खेळताना दिसतोय. 
 मामा-भाचीचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे.
सलमानची बहीण अर्पिताने सलमान खानच्या वाढदिवशीच आयतला जन्म दिला होता. भाईजानच्या 54 व्या वाढदिवशी त्याला एक अनमोल गिफ्ट देणार असल्याचे अर्पिताने आधीच जाहीर केले होते.

त्यानुसार, अर्पिताने सलमानच्या वाढदिवशी म्हणजे गत 27 डिसेंबरला सी सेक्शनद्वारे  गोंडस मुलीला जन्म दिला होता. आयतच्या जन्माने भाईजान प्रचंड खूश आहे. वेळ मिळाला की, तो तिच्यासोबत खेळायला पोहोचतो. सलमानला मुलं आवडतात. पण या व्हिडीओत आयत आणि सलमान यांचे नाते  खास असल्याचे लक्षात येते.

अर्पिता खान शमार्चे हे दुसरे अपत्य आहे. 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्ष लहान बॉयफ्रेन्ड आयुष शमार्सोबत लग्न केले. आयुष हा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक प्रतिष्ठित राजकीय घराण्याचा वारसदार आहे.

अर्पिता आणि आयुष यांना आहिल नावाचा एक मुलगा आहे.
सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचे तर तो लवकरच ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभूदेवा करत आहे.

Web Title: salman khan caress her niece ayat video viral on social media-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.