सलमान खान : सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 05:23 PM2016-12-23T17:23:36+5:302016-12-23T17:23:36+5:30

२०१६ या वर्षातील बॉलिवूडचा सर्वांत मोठा स्टार कोणता? या प्रश्नाचे उत्तर देणे जरा कठीण असले तरी सर्वाधिक कमाई करणारा ...

Salman Khan: A celebrity star of highest earning | सलमान खान : सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी स्टार

सलमान खान : सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी स्टार

googlenewsNext
ong>२०१६ या वर्षातील बॉलिवूडचा सर्वांत मोठा स्टार कोणता? या प्रश्नाचे उत्तर देणे जरा कठीण असले तरी सर्वाधिक कमाई करणारा स्टार कोणता याची माहिती मिळू शकते. जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने २०१६ मध्ये भारतात सर्वाधिक कमाई करणाºया सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे.

फोर्ब्सच्या या यादीत सलमान खान पहिल्या स्थानवर असून, त्याने या वर्षांत एकूण २७०.३३ कोटींची कमाई केली आहे. मागील वर्षी पहिल्या स्थानी असणारा शाहरुख यंदा दुसºया स्थानी आहे. मात्र आमिर खानला पहिल्या दहा स्टारमध्येही जागा मिळविता आले नाही.

२०१६ या वर्षांत यशराज बॅनर निर्मित ‘सुल्तान’ या चित्रपटात सलमानने मुख्य भूमिका साकारली होती. वर्षांत त्याचा एकच चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी बॉक्स आॅफिसवर कमाईच्या बाबतीत अन्य चित्रपट कुठेच नव्हते. ‘सुल्तान’ने ३०० कोटींच्यावर कमाई केली. याशिवाय २०१६ या वर्षांत सलमान खानने चित्रपट निर्मिती क्षेत्रात उडी घेतली आहे. २०१५ च्या शेवटी सलमानचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट हिट ठरला होता.

दुसºया स्थानी २२१.७५ कोटी रुपयांची कमाई करणारा शाहरुख खान असून तो मागील वर्षी पहिल्या स्थानी होता. तिसºया स्थानी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली असून त्याने १३४.४४ कोटींची कमाई केली. मागील वर्षी विराट कोहली ७ व्या स्थानी होता. 

विशेष म्हणजे या यादीत पहिल्या दहा सेलिबे्रटींमध्ये आमिर खानला जागा मिळविता आली नाही. मागील वर्षी आमिर खान पाचव्या स्थानी होता. सर्वाधिक कमाई करणाºया बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये दीपिका पादकोण आघाडीवर असून ती सहाव्या स्थानी आहे. तर प्रियांका चोप्रा हिने तिने फोर्ब्सच्या टॉप १० मध्ये स्थान मिळविले आहे. 

फोर्ब्सच्या यादीतील सर्वाधिक कमाई करणारे भारतीय सेलिब्रेटी 
सलमान खान      : २७०.३३ 
शाहरुख खान       : २२१.७५
विराट कोहली       : १३४.४४
अक्षय कुमार        : १३३.०३
महेंद्र सिंग धोनी    : १२२.४८
दीपिका पादुकोण   : ६९.७५
सचिन तेंदुलकर     : ५८.००
अमिताभ बच्चन     : ७६.००
प्रियांका चोप्रा         : ३२.६२
हृतिक रोशन         : ९०.२५
 

Web Title: Salman Khan: A celebrity star of highest earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.