"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:05 PM2024-09-16T21:05:56+5:302024-09-16T21:09:10+5:30

Salman Khan Clarification on Fraud ticket selling: सलमान खानने आपल्या अधिकृत अकाऊंटवर एक छोटा संदेश लिहिला आहे

Salman Khan Clarification on Fraud ticket selling in US through official Instagram account warning fans | "तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?

"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?

Salman Khan Clarification on Fraud ticket selling: फसवणूक करणारे नेहमीच संधीच्या शोधात असतात. सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या सुपरस्टार्सच्या नावावर अनेकवेळा खोट्या गोष्टी पसरवून आर्थिक फसवणूक केली जाते. आताही असेच एक नवीन प्रकरण समोर आले होते. त्यात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या शो ची तिकीटे चाहत्यांना विकली जात होती. शो अमेरिकेत असल्याचे सांगितले गेले होते. पण प्रत्यक्षात शो ची तिकिटे विकण्याच्या नावाखाली फसवणून करून चाहत्यांना लुबाडले जात होते. या सर्व गोष्टींवर सलमान खानने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्पष्टीकरण दिले आहे.


सलमान खान अनेकदा परदेशात त्याचे शो करतो. याचाच फायदा घेत काही घोटाळेबाजांनी त्याच्या चाहत्यांची फसवणूक सुरू केली. पण ही बाब लक्षात येताच सलमान खानच्या मॅनेजरने ही फसवणूक असल्याचे लक्षात आणत पोस्ट केली आणि लोकांना सावध केले. त्यानंतर सलमान खानच्या अधिकृत अकाऊंटवरूनही याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. सलमान २०२४ या वर्षात अमेरिकेत कोणताही शो करणार नाहीये, त्यामुळे चाहत्यांनी अफवांना बळी पडू नये आणि कुठल्याही आर्थिक फसवणुकीचे शिकार होऊ नये, असे सलमानच्या ऑफिशियल पोस्ट मध्ये लिहिले आहे.

दरम्यान, सोमवारी सलमान खानचे मॅनेजर जॉर्डी पटेल यांनी एक पोस्ट केली. त्यांनी सलमान खानच्या अमेरिकेत होणाऱ्या शोची बनावट पोस्ट शेअर केली आणि लोकांना स्कॅमर्सच्या तावडीत न पडण्यास सांगितले. त्याने इंस्टा स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर केला. त्यात तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म दावा करत होते की सलमान खान आर्लिंग्टन थिएटरमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहे. यात सलमान खानचा एक फोटो देखील दिसत होता. हा स्क्रीनशॉट शेअर करताना जॉर्डीने इंस्टाग्रामवर लिहिले- तिकीट खरेदी करू नका. सलमान खान २०२४ मध्ये अमेरिकेत दिसणार नाही.

Web Title: Salman Khan Clarification on Fraud ticket selling in US through official Instagram account warning fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.