शिवलिंगाच्या फोटोवरून वाद! ‘दबंग’ सलमान खानला करावा लागला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:56 PM2019-04-04T14:56:41+5:302019-04-04T14:56:54+5:30
सध्या मध्यप्रदेशातील महेश्वर येथे सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु आहे. पण शूटींग सुरु होऊन उणेपुरे चार दिवस होत नाही, तोच हा चित्रपट वादात सापडला आणि खुद्द सलमानला या वादावर खुलासा द्यावा लागला.
सध्या मध्यप्रदेशातील महेश्वर येथे सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शूटींग सुरु आहे. पण शूटींग सुरु होऊन उणेपुरे चार दिवस होत नाही, तोच हा चित्रपट वादात सापडला आणि खुद्द सलमानला या वादावर खुलासा द्यावा लागला.
होय, काल बुधवारी ‘दबंग 3’च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला आणि या वादाला तोंड फुटले. या फोटोत एक शिवलिंग लाकडाच्या चौकटीने झाकलेले दिसत होते. दुपारी हा फोटो व्हायरल झाला आणि लोकांनी सेटवर गोंधळ घातला. केवळ इतकेच नाही तर सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपानेही या वादात उडी घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते हितेश वाजपेयी यांनी गुरुवारी ट्वीट करून, या वादाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. या वादानंतर लगेच सेटवरच्या शिवलिंगावरची लाकडी चौकट हटवण्यात आली आणि यानंतर संध्याकाळी सलमानने या सगळ्या वादावर खुलासा करावा लागला.
वन्दे-मातरम .....
— Dr.Hitesh Bajpai (@drhiteshbajpai) April 4, 2019
खान साहब "वन्दे-मातरम" कहने पर जब आपका धर्म खतरे में आ जाता है तब आपने कैसे सोच कि आप १२ ज्योतिर्लिंगों में से एक ओंकारेश्वर-महेश्वर पहुँच कर "शिव-लिंग" पर चारपाई बिछाकर उनके सर पर नाच करेंगे... https://t.co/ZhpIagxnep
शूटींगदरम्यान शिवलिंगाचा अनादर होऊ नये, वा त्यास नुकसान होऊ नये, म्हणून त्यावर लाकडी चौकट टाकून ते झाकण्यात आले होते. काही लोकांनी या लाकडी चौकटीचा दुरूपयोग केल्याचे लक्षात येताच, ही चौकट तातडीने हटवण्यात आली. मी स्वत: एक खूप मोठा शिवभक्त आहे.मी येथे शूटींग करू नये, असे तुम्हाला वाटत असेल तर मी तात्काळ पॅकअप करून उत्तर प्रदेशात शूटींगसाठी जाईज. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आग्रहास्तव आम्ही ‘दबंग 3’च्या शूटींगसाठी महेश्वरची निवड केली. माझे आजोबा याठिकाणी पोलिस खात्यात तैनात होते. त्यामुळे महेश्वरला मी माझे दुसरे घर समजतो. मी कधीच शूटींगच्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाही. पण महेश्वरचे नाव व्हावे, यासाठी मी सेटवरचे अनेक फोटो-व्हिडीओ पोस्ट करतोय, असे सलमानने म्हटले.