"सलमानने माझ्या तोंडावर बंद केलेला दरवाजा...", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - शाहरुखने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:06 IST2025-02-08T12:04:53+5:302025-02-08T12:06:28+5:30
नव्वदच्या दशकातील अभिनेत्रीने सलमान खान आणि शाहरुख खानबद्दल केला धक्कादायक खुलासा

"सलमानने माझ्या तोंडावर बंद केलेला दरवाजा...", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - शाहरुखने...
नव्वदच्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) सध्या एकामागून एक खुलासे करत आहे. नुकतीच ही अभिनेत्री एका खासगी वाहिनीच्या शोमध्ये दिसली. यादरम्यान अभिनेत्रीने सलमान खान आणि शाहरुख खानबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या की तिचे वक्तव्य काही मिनिटांतच व्हायरल झाले. यामध्ये अभिनेत्रीने सांगितले की, सलमानने तोंडावर कसे दार बंद केले होते.
ममला कुलकर्णीने १९९५ मध्ये आलेल्या 'करण अर्जुन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग शेअर केला होता. अभिनेत्री म्हणाली की, 'चिन्नी प्रकाश या चित्रपटाची कोरिओग्राफर होती. शाहरुख आणि सलमान दोघेही शूटिंगला गेले होते. मी एकटीच बसले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर चिन्नी प्रकाशच्या असिस्टंटने दरवाजा ठोठावला. मी विचारले काय झाले, ते म्हणाले की मास्टर जींनी तुला बोलावले आहे. मी वर गेले. तिथे पायऱ्या होत्या. मी चढत असताना सलमान आणि शाहरुख माझ्या जवळून गेले. रात्रीचे साधारण आठ वाजले असतील. मी मास्टर जींकडे गेले. त्यांनी मला सांगितले की तू ही काही स्टेप्स एकटीच करशील. मी म्हणाले हे काय करताय तुम्ही? दुसऱ्या दिवशी माझा पहिला शॉट होता. त्यावेळी मी पाहिले की शाहरुख आणि सलमान दोघेही झुडपातून माझ्याकडे बघत होते आणि तो हसत होता. पण माझा पहिलाच शॉट मंजूर झाला.
तोंडावर दरवाजा केला बंद
ममता पुढे म्हणाली की, 'मी पाहिले की शाहरुख आणि सलमान माझ्याकडे गुपचूपपणे पाहत होते. पुढचा शॉट त्यांचा होता. त्यांना गुडघ्यावर बसून स्टेप्स करायच्या होत्या. तिथे ५००० लोक होते. दोघांनीही अनेक रिटेक घेतले. अगदी दिग्दर्शकही त्यांना ओरडले. आम्ही सगळे लगेच आपापल्या खोलीकडे धावलो. आदल्या दिवशी संध्याकाळी ते माझ्याशी विनोद करत होता हे मला माहीत होते. पण मला त्यांच्यासोबत असं करायचं नव्हतं. त्यामुळे मी त्यांच्याकडे गेल्यावर सलमान खानने मला थांबवले आणि तोंडावर दरवाजा बंद केला. हे सर्व घडले आहे. ममता म्हणाली की, सलमान खान खूप खोडकर आहे आणि मी वक्तशीर आहे. तो मला नेहमी चिडवायचा आणि मी सलमानला शांत हो म्हणायचे.