कुठे गेली आणि आता कशी दिसते सलमानची हिरोईन रंभा? आताचे फोटो बघाल तर अवाक् व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 17:32 IST2021-12-02T17:28:48+5:302021-12-02T17:32:26+5:30
Actress Rambha : बॉलिवूडमध्ये काही हिट सिमेने दिल्यावर रंभा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. बॉलिवूडपासून दूर गेल्यावर तिने काही तमिळ सिनेमात कामे केली.

कुठे गेली आणि आता कशी दिसते सलमानची हिरोईन रंभा? आताचे फोटो बघाल तर अवाक् व्हाल
सलमान खानसोबत (Salman Khan) बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या अभिनेत्रींनी काम केलं. त्यातीलच एक नाव म्हणजे रंभा (Actress Rambha). रंभा (Rambha) सलमान खानसोबत १९९७ मध्ये आलेल्या 'जुडवा' आणि त्यानंतर १९९८ मध्ये आलेल्या 'बंधन' सिनेमात दिसली होती. बॉलिवूडमध्ये काही हिट सिमेने दिल्यावर रंभा अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. बॉलिवूडपासून दूर गेल्यावर तिने काही तमिळ सिनेमात कामे केली. मात्र, लग्नानंतर तिने फिल्मी करिअरपासून स्वत:ला वेगळं केलं.
गेली बरीच वर्ष रंभा कुठे आहे? काय करते हे माहीत नव्हतं. मात्र, आता रंभाचा पत्ता लागला आहे. नुसताच पत्ताच लागला नाहीतर तिच्या फॅमिलीबाबतही समजलं आहे. रंभाने कॅनाडातील बिझनेसमन इंद्रकुमारसोबत २०१० मध्ये लग्न करून संसार थाटला. आता तर तिच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ओळखायलाही येत नाही. कारण तिच्या बराच फरक पडला आहे.
रंभाच्या इन्स्टाग्रामवर तिच्या पर्सनल लाइफची झलक बघायला मिळते अनेक फोटोंमध्ये रंभा तिच्या दोन मुली, एक मुलगा आणि पतीसोबत दिसत आहे. तिचा हा परिवार फारच आनंदी दिसतोय. रंभा तिच्या परिवारासोबत आता भारतात राहत नाही. ती टोरांटोमध्ये राहते. तिला दोन मुली लानिया आणि सशा आहेत. तर तिने २०१८ मध्ये एका मुलाला जन्म दिला. त्याचं नाव शिविन आहे.
रंभा साऊथमध्ये फारच लोकप्रिय होती. तिने रजनीकांत, कमल हसन, विजय आणि अजीथसारख्या टॉपच्या हिरोंसोबत काम केलं आहे. साधारण १० वर्षाआधी तिने सिने इंडस्ट्री सोडली. नुकताच रंभाने तिच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस साजरा केला.