- म्हणून रिलीजनंतर ‘दबंग 3’वर चालली कात्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 16:03 IST2019-12-23T16:02:14+5:302019-12-23T16:03:28+5:30

‘दबंग 3’चे नवे व्हर्जन...

salman khan dabangg 3 trimmed 9 minutes 40 seconds portions reduced from the run time | - म्हणून रिलीजनंतर ‘दबंग 3’वर चालली कात्री!!

- म्हणून रिलीजनंतर ‘दबंग 3’वर चालली कात्री!!

ठळक मुद्दे‘दबंग 3’ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती.

सलमान खानचादबंग 3’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. नेहमीप्रमाणे भाईजानच्या चाहत्यांना हा सिनेमा आवडला पण प्रेक्षकांची मात्र या सिनेमाने पुरती निराशा केली. अशात मेकर्सनी काही दृश्यांना कात्री लावत, चित्रपटाचा कालावधी 9 मिनिट 40 सेकंदांनी कमी केल्याची बातमी आहे.
ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली. प्रदर्शनाच्या दुस-या दिवशी ‘दबंग 3’चा टोटल रन टाईम 9 मिनिट 40 सेकंदाची कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले.



 

‘दबंग 3’ हा सिनेमा 2 तासांपेक्षा अधिक असल्याने टीकेचा धनी ठरला होता. चित्रपटातील गाण्यांमुळे कथेत व्यत्यय येत असल्याच्याही तक्रारी होत्या. यामुळे ही दृश्ये वगळण्यात आल्याचे मानले जात आहे. चित्रपटातील फर्स्ट पार्टमधील गाणी आणि काही दृश्यांवर कात्री चालवण्यात आली आहे. सलमान व सई मांजरेकर यांच्यावर चित्रीत ‘आवारा’ आणि ‘नैना लडे’ ही गाणी एडिट करण्यात आली आहेत. आता चित्रपटगृहांना ‘दबंग 3’चे नवे व्हर्जन दाखवण्याची विनंती करण्यात आली आहे.


‘दबंग 3’ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे सलमानच्या डायहार्ट फॅन्सला हा सिनेमा नेहमीप्रमाणे आवडला. पण काही युजर्सनी मात्र ‘दबंग 3’वर नाराजी व्यक्त केली होती. ‘मला फ्रीमध्ये तिकिट मिळाले होते. पण चित्रपट पाहिल्यानंतर मी फ्रीमध्येही का तिकिट घेतले, असे मला वाटले. सलमान भाई आखीर कब तक़.. चांगले चित्रपट बनव, नाहीतर संन्यास घे,’ अशा अनेक कमेंट यानं

Web Title: salman khan dabangg 3 trimmed 9 minutes 40 seconds portions reduced from the run time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.