आपल्या बायोपिकला घेऊन सलमान खानने केले 'हे' मोठे वक्तव्य, जाणून घेण्यासाठी क्लिक करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 04:16 PM2018-07-05T16:16:08+5:302018-07-05T16:23:27+5:30
संजूच्या बायोपिकनंतर सलमान खानचे बायोपिक सध्या जोरात चर्चा आहे. खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे यात कोणाचेही दुमत नाही
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. संजय दत्तच्या बायोपिकला मिळालेल्या यशानंतर अनेक कलाकारांच्या बायोपिकची चर्चा आहे. संजूच्या बायोपिकनंतर सलमान खानचे बायोपिक सध्या जोरात चर्चा आहे. खान बॉलिवूडचा सुपरस्टार आहे यात कोणाचेही दुमत नाही. सलमान खानचे चित्रपट फक्त त्याच्या नावावर चालतात हे आपल्याला माहितीच आहे. संजूबाबाप्रमाणे सलमानच्या आयुष्यात ही अनेक चढ-उत्तार आले आहेत. त्यामुळे त्याचा बायोपिक सिल्वर स्क्रिनवर पाहण्यासाठी त्याचे चाहते नक्कीच उत्सुक असतील.
सलमानच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याच्या चर्चेवर तो म्हणाला,'' माझ्या आयुष्याबाबत लोकांना सगळेच माहिती आहे. संजूचे आयुष्यही लोकांना माहिती होते. मात्र मला नाही वाटतात की माझ्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात यावा.'' यावरुन एक स्पष्ट होते की सलमानच्या फॅन्सना त्याचा बायोपिक बघायला मिळणार नाही आहे.
सलमानच्या प्रोफेशन लाईफ बाबत बोलायचे झाले तर सध्या तो 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. भारतमध्ये सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान 'भारत'मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे. यात त्याच्या बहिणीची भूमिका दिशा पटानी साकारणार आहे तर सलमानच्या अपोझिट प्रियांका चोप्राला साईन करण्यात आले आहे. टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2019च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'भारत'ची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो 'दबंग 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे समजतेय.