सलमानला 'पार्टनर'मध्ये गोविंदासोबत करायचे नव्हते काम, डेविड धवन किस्सा सांगत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 12:55 PM2024-08-01T12:55:35+5:302024-08-01T12:56:29+5:30

David Dhawan : दिग्दर्शक डेविड धवन यांनी 'पार्टनर' चित्रपटासंदर्भात एक किस्सा सांगितला.

Salman Khan did not want to work with Govinda in 'Partner', says David Dhawan anecdote... | सलमानला 'पार्टनर'मध्ये गोविंदासोबत करायचे नव्हते काम, डेविड धवन किस्सा सांगत म्हणाले...

सलमानला 'पार्टनर'मध्ये गोविंदासोबत करायचे नव्हते काम, डेविड धवन किस्सा सांगत म्हणाले...

बॉलिवूड दिग्दर्शक डेविड धवन (David Dhawan) आणि अभिनेता गोविंदा(Govinda)ने १९९० साली आपल्या जुगलबंदीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्या दोघांनी जवळपास १७ हिट सिनेमात काम केले होते. नुकतेच एका मुलाखतीत डेविड धवन यांनी त्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ते एकटे असे व्यक्ति होते जे गोविंदाला सांभाळू शकत होते. तसेच त्यांनी पार्टनर चित्रपटासंदर्भातील एक मजेशीर किस्सादेखील शेअर केला. त्यांच्यानुसार, या चित्रपटाच्या आधी सलमान(Salman Khan)ला गोविंदासोबत काम करायचे नव्हते.

डेविड धवनने सांगितले की, आधी सलमान खान पार्टनर चित्रपटाबाबत उत्सुक नव्हता. मात्र त्याने सांगितले की, जेव्हा निर्माता सोहेल खानसोबत चित्रपटासंदर्भात चर्चा झाली तेव्हा तो तयार झाला. ते म्हणाले की, मी म्हणालो आपण गोविंदा आणि सलमान भाईला घेऊ शकतो का? त्यावर तो म्हणाला खूप छान. मी सलमान भाईकडे गेलो. पण तो खूप उत्सुक नव्हता. मी म्हटलं की, चल यार, करूयात. ही एक मोठी गोष्ट असेल. त्यानंतर डेविड धवन यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, सलमाने एक दिवस मला सांगितले, जेव्हा आम्ही बँकॉकमध्ये शूटिंग करत होतो. तो म्हणाला, डेविड यार, यांच्यासोबत भांडण्याचा...फायदा नाही.

गोविंदाने सोडला होता 'जुडवा' चित्रपट 
विशेष म्हणजे गोविंदाने एकदा खुलासा केला होता की सलमान खानने त्याला फोन करून डेविड धवनचा जुडवा सोडून हा चित्रपट देण्यास सांगितले होते. गोविंदाने त्याची विनंती मान्य केली आणि या चित्रपटात सलमानने दुहेरी भूमिका साकारल्या, जो त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला.

Web Title: Salman Khan did not want to work with Govinda in 'Partner', says David Dhawan anecdote...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.