सलमान खानची ट्युबलाईट पेटलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 06:05 AM2017-06-27T06:05:28+5:302017-06-27T11:37:13+5:30

सल्लू मियाँ आणि ईद यांचे गेल्या तीन वर्षांपासून एक वेगळेच नातं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान आपल्या फॅन्ससाठी आपल्या ...

Salman Khan does not have a Tubalite belt | सलमान खानची ट्युबलाईट पेटलीच नाही

सलमान खानची ट्युबलाईट पेटलीच नाही

googlenewsNext
्लू मियाँ आणि ईद यांचे गेल्या तीन वर्षांपासून एक वेगळेच नातं आहे. दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान आपल्या फॅन्ससाठी आपल्या एका चित्रपटाची मेजवानी घेऊन येतो. ईदच्या मुहुर्त साधत कबीर खान दिग्दर्शित ट्युबलाईट चित्रपट प्रदर्शित झाला मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा प्रकाश पाडू शकला नाही. सलमान खानला अपेक्षा होती हा चित्रपट त्याच्या मागच्या चित्रपटांचे सगळे रेकॉर्ड बॉक्स ऑफिसवर तोडून टाकेल मात्र त्याचा अपेक्षा भंग झाला. ट्युबलाईट चित्रपट बाहुबली 2 ला ही मागे टाकले असा अंदाज बांधण्यात येत होतो मात्र तो फोल ठरला. रिलीज झाल्यावर शुक्रवारी ट्यूबलाईटने 21.15 कोटींचा गल्ला जमवला, शनिवारी सिनेमाने 21.15 कोटींची कमाई केली तर रविवारच्या दिवशी जवऴपास 22 कोटी कोटींचा बिझनेस केला त्यामुळे सलमानच्या ट्य़ुबलाईटने पहिल्या तीन दिवसांत 64.77 कोटींचा गल्ला जमावला. ही आता पर्यंत सलमानच्या चित्रपटाने ईदच्या मुहुर्तावर केलेली सगळ्यात कमी कमाई आहे.  2016 मध्ये ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या कुस्तीवर आधारित सुल्तान चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने  सिनेमागृहांच्या खिडकीवर 105. 53 कोटी कमाविले होते. सलमानला वाटत होते ट्युबलाईट या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडले मात्र तसे झाले नाही. या चित्रपटात त्याच्यासह अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील होती. अली अब्बास जफरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सलमान आणि अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. अनेक दिवस हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये हाऊसफुल्ल जात होता.  तर या आधी 2015 मध्ये आलेल्या बजरंगी भाईजानने ही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. बजरंगी भाईजानने पहिल्या तीन दिवसात 102.60 कोटींची कमाई केली होती. बजरंगी भाईजान या चित्रपटाचे दिग्दर्शनी ही कबीर खानने केले होते.  

Web Title: Salman Khan does not have a Tubalite belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.