सलमान खान का घेत नाही एकही सुट्टी? जाणून घ्यायचे तर वाचा बातमी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 08:06 AM2018-05-30T08:06:11+5:302018-05-30T13:36:11+5:30
सलमान खान आणखी एक ब्लॉकबस्टर देण्यासाठी तयार आहे. होय, ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा ‘रेस3’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे ...
स मान खान आणखी एक ब्लॉकबस्टर देण्यासाठी तयार आहे. होय, ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा ‘रेस3’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सलमानशिवाय आणखी सहा दिग्गज कलाकार आहेत. ताजी बातमी खरी मानाल तर, या चित्रपटासाठी बॉबी देओलपासून साकिब सलीम अशा सगळ्यांनाच तगडे मानधन देण्यात आले आहे. ‘रेस3’ची लोकांना उत्सुकता आहेच. पण त्याशिवाय सलमानच्या एका टीव्ही शोकडेही लोक डोळे लावून बसले आहेत. हा शो कुठला तर ‘दस का दम’. दहा वर्षानंतर सलमानने ‘दस का दम’ या शोमध्ये वापसी केलीय. अलीकडे या शोच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सलमान पोहोचला आणि मग बरेच काही बोलला. अगदी टीव्हीवर येण्यास वाटत असलेल्या भीतीपासून तर एकही सुट्टी न घेता काम करण्याबद्दल.
होय, आधी सलमान टीव्हीवर येण्यास घाबरायचा. सलमाननेचं याबद्दल सांगितले. टीव्ही एक सशक्त माध्यम आहे, हे मी जाणून होतो. मला छोट्या पडद्याची आॅफर आली, तेव्हा मी पहिल्यांदा प्रचंड घाबरलो होतो. माझी समाजातील प्रतिमा बघता, मला टीव्हीचे प्रेक्षक स्वीकारतील का, असा प्रश्न त्यावेळी मला पडला होता. मग मी डॅडकडे गेलो. मी टीव्हीवर जावे का, असा एकच प्रश्न मी त्यांना केला. यावर डॅडनी मला समजावले. हाच तुझा खरा चेहरा आहे़. जा आणि लोकांना दाखव की, तू कसा आहेस. लोकांनी स्वीकारले तर बरे, नाही तर तुला स्वत:त बदल करावा लागेल, असे ते मला म्हणाले. यानंतर मी टीव्हीवर येण्याचा निर्णय घेतला, असे सलमानने यावेळी सांगितले. स्वत:बद्दलची आणखी एक गोष्ट सलमानने सांगितली. ती म्हणजे, तो एकही सुट्टी न घेता काम का करतो, ते. मी रोज जे काम करतो, त्यामुळे अनेकांना वेतन मिळते.या लोकांसाठी तरी सुट्टी घेण्याऐवजी मला रोज काम करणे भाग आहे, हाच यामागचा माझा विचार आहे. माझे आयुष्य हीच माझी सुट्टी आहे, असे तो म्हणाला.
ALSO READ :जॅकलिन फर्नांडिस व सलमान खानने केले असे काही! लोक म्हणाले, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती!!
‘टायगर जिंदा है’च्या जरबदस्त यशानंतर रेस-३’मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टार सलमानचा अॅक्शन अंदाज बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट येत्या ईदला प्रदर्शित होईल. ‘रेस-३’मध्ये सलमान, जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम बघावयास मिळणार आहेत. रेमो डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.