सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:59 AM2024-10-17T10:59:37+5:302024-10-17T11:00:12+5:30

बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी मिळाल्यानंतर भाईजानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिश्नोईला खास मेसेज दिला आहे. 

salman khan ex girlfriend somy ali direct message to lawrence binshoi said i want to talk to you on zoom call | सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."

सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत आला आहे. बिश्नोई गँगने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेत सलमान खानला पु्न्हा जीवेमारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. याआधीही बिश्नोईने अनेकदा सलमानला धमकवण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिन्यांपूर्वीच सलमानच्या घराबाहेर बिश्नोई गँगकडून हवेत गोळीबारही करण्यात आला होता. आता बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर पुन्हा बिश्नोई गँगकडून सलमानला टारगेट करण्याची शक्यता आहे. बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी मिळाल्यानंतर भाईजानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिश्नोईला खास मेसेज दिला आहे. 

सोमी अलीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने लॉरेन्सला मेसेज देत त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "लॉरेन्स बिश्नोई हा खास तुझ्यासाठी मेसेज आहे. लॉरेन्स भाई नमस्ते, मी असं ऐकलं आहे आणि बघितलंदेखील आहे की तू जेलमधून झूम कॉल करतोस...मलादेखील तुझ्याशी बोलायचं आहे. कृपया करून मला सांगा की हे कसं शक्य होईल? या संपूर्ण जगात राजस्थान हे माझं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे. मला तुझ्या मंदिरात पूजा करण्यासाठी यायचं आहे. पण, त्याआधी मला तुझ्याबरोबर झूम कॉलवर बोलायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेव या तुझ्या फायद्याच्या गोष्टी आहेत. तुझा मोबाईल नंबर दे...खूप उपकार होतील, धन्यवाद", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


सोमी अली आणि सलमान काही वेळ रिलेशनशिपमध्ये होते. अभिनेत्रीने सलमानवर गंभीर आरोपही केले होते. सलमान आणि संगीता बिजलानीचं लग्न मोडण्यास सोमी अली कारणीभूत होती. संगीताने सलमान आणि सोमी अलीला रंगेहाथ पकडलं होतं. खुद्द सोमी अलीनेच याचा खुलासा मुलाखतीत केला होता. आता लॉरेन्स बिश्नोईला थेट मेसेज दिल्याने सोमी अली पुन्हा चर्चेत आली आहे. 

Web Title: salman khan ex girlfriend somy ali direct message to lawrence binshoi said i want to talk to you on zoom call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.