‘टायगर जिंदा हैं’च्या सेटवर कॅटरिना कैफविना एकाकी पडला सलमान खान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 10:33 AM2017-03-25T10:33:40+5:302017-03-25T16:03:40+5:30
काल जेव्हा कॅटरिना कैफला मुंबई विमानतळावर बघण्यात आले तेव्हा सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या फॅन्सच्या मनात प्रश्नांचे अक्षरश: काहुर ...
क ल जेव्हा कॅटरिना कैफला मुंबई विमानतळावर बघण्यात आले तेव्हा सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या फॅन्सच्या मनात प्रश्नांचे अक्षरश: काहुर माजले होते. सलमानशिवाय कॅटरिना एकटी कशी परतली?, असे काय घडले की कॅटरिनाला अचानकच परतावे लागले?, सलमान आणि कॅटरिनाच्या संबंधांमध्ये सर्व काही आलबेल आहे का? अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या फॅन्सला अक्षरश: पछाडले होते. मात्र आम्ही तुमच्या मनातील या सर्व प्रश्नांचे उत्तरे देणार आहोत. आमच्या सूत्रानुसार दोघांमध्ये सर्व काही आलबेल असून, कॅटरिना तिच्या वाट्याची शूटिंग पूर्ण करून परतली आहे. मात्र आता ‘टायगर जिंदा है’च्या सेटवर सलमान एकाकी पडला असून, कॅटरिनाविनाच तो त्याच्या वाट्याची शूटिंग पूर्ण करीत आहे.
सूत्रानुसार सलमान अजूनही आॅस्ट्रिया येथेच असून, तो त्याच्या सोलो सीन्सच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर कॅटरिनाने तिची शूटिंग पूर्ण केल्याने ती मुंबईत परतली आहे. ज्या सीन्सची सलमान सध्या शूटिंग करीत आहे ते खूप अॅक्शन सीन्स असून, कॅटरिना व्यतिरिक्तच सलमानलाच ते सीन्स पूर्ण करावे लागत आहेत. निर्माता अली अब्बास जफरने या चित्रपटातील एका एक्शन सीक्वेंसची झलकही सोशल मीडियावर शेअर केली होती. जे बघून सलमानच्या फॅन्सला या चित्रपटाविषयी जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘एक था टायगर’ या चित्रपटाचा ‘टायगर जिंदा हैं’ हा सीक्वल असून, पहिल्या भागात धमाकेदार अॅक्शन प्रेक्षकांना बघावयास मिळाली होती. त्यामुळे दुसºया भागातही असेच काही तरी बघावयास मिळेल अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. शूटिंगसाठी ‘आॅस्ट्रिया’सारखे ठिकाण निवडल्याने या चित्रपटातील अॅक्शनचा अंदाज लावता येऊ शकतो. कॅटरिनाने तर सेटवरील बरेचसे फोटोज् तिच्या फॅन्ससाठी शेअर केल्याने या चित्रपटातील एक्शनची झलकच प्रेक्षकांना बघावयास मिळत आहे.
गेल्या आठवड्यातच सलमान आणि कॅटरिनाने आॅस्ट्रिया येथे ‘दिल दिय्या गल्ला’ या रोमॅण्टिक गाण्याची शूटिंग पूर्ण केली होती. याविषयी बोलताना टीमशी संबंधित एका सूत्राने सांगितले होते की, या गाण्याची शूटिंग आम्ही आॅस्ट्रिया येथील टायरोल प्रांतात केली. मुळात हा परिसर ऐतिहासिक असल्याने याठिकाणी शूट करण्यात आलेले हे गाणे जबरदस्त रोमॅण्टिक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते भावेल यात शंका नाही.
ALSO READ : SEE PIC : ‘टायगर जिंदा है’ ची शूटिंग सोडून कॅटरिना कैफ परतली मुंबईत!!