सलमान खानच्या फॅन्सनी केले त्याचे दमदार स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 09:00 PM2019-03-01T21:00:00+5:302019-03-01T21:00:00+5:30

सध्या सलमान खान त्याचा आगामी सिनेमा भारतला घेऊन चर्चेत आहे. नुकताच सलमान खान चंडीगढच्या क्रिकेट स्टेडियममध्ये गेला होता.

Salman khan fans welcomes him by this dashing way | सलमान खानच्या फॅन्सनी केले त्याचे दमदार स्वागत

सलमान खानच्या फॅन्सनी केले त्याचे दमदार स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान खान येणार याची माहिती त्याच्या फॅन्सना आधीच मिळाली होतीसलमानची एंट्री होताच त्याचे फॅन्सनी एकच सलमानच्या नावाचा जल्लोष केला

सध्या सलमान खान त्याचा आगामी सिनेमा भारतला घेऊन चर्चेत आहे. नुकताच सलमान खान चंडीगढच्या क्रिकेट स्टेडियम मध्ये गेला होता. सलमान खानचा लहान भाऊ सोहेल खानच्या मुंबई हीरोज टीमला चिअरअप करण्यासाठी सलमान गेला होता. 


सलमान खान येणार याची माहिती त्याच्या फॅन्सना आधीच मिळाली होती. त्यामुळे सलमानची एक झलक मिळवण्यासाठी स्टेडिअममध्ये खचाखच गर्दी होता. सलमानसोबत याठिकाणी बोनी कपूर, सुनील शेट्टी, रितेश देशमुख आणि मनोज तिवारी सुद्धा आले होते. स्टेडिअममध्ये सलमानची एंट्री होताच त्याचे फॅन्सनी एकच सलमानच्या नावाचा जल्लोष केला. विशेष म्हणजे यात सलमानचे लहानगे फॅन्ससुद्धा यात सहभागी होते. सलमानने देखील लहान फॅन्सना निराश केले नाही त्यांच्यासोबत जाऊन त्याने सेल्फी काढले.     

 सलमानच्या सिनेमाबाबत बोलायचे झाले तर भारत सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत सीमित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.  'भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. 

Web Title: Salman khan fans welcomes him by this dashing way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.