सलमान खानने ‘टायगर जिंदा है’च्या यशाचे यांना दिले श्रेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 03:45 PM2018-01-03T15:45:35+5:302018-01-03T21:15:35+5:30

सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली असून, पहिल्यांदाच सलमानने या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर!

Salman Khan gave credit to success of 'Tiger Zinda Hai' | सलमान खानने ‘टायगर जिंदा है’च्या यशाचे यांना दिले श्रेय!

सलमान खानने ‘टायगर जिंदा है’च्या यशाचे यांना दिले श्रेय!

googlenewsNext
परस्टार सलमान खान याच्या ‘टायगर जिंदा है’ने दुसºया आठवड्यातही बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात २८८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइड ४२३.५९ कोटींचा गल्ला जमविला आहे. ज्या पद्धतीने चित्रपट अजूनही बॉक्स आॅफिसवर आपला जलवा दाखवित आहे, त्यावरून सलमान-कॅटरिना खूश आहेत. सलमान या यशाचे श्रेय स्वत:ला नव्हे तर प्रेक्षकांना देऊ इच्छितो. पहिल्यांदाच सलमानने त्याच्या या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली असून, प्रेक्षकांचे त्याने आभार मानले आहेत. 

मिड डेशी बोलताना सलमानने म्हटले की, माझ्यासाठी प्रेक्षकांची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण आहे. चित्रपटाला ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी प्रेम दिले त्यावरून मी आनंदी आहे. अली अब्बास सफरबरोबर हा माझा दुसरा चित्रपट आहे. शिवाय पुढच्या काळातही मी त्याच्यासोबत काम करण्याचा विचार करीत आहे. जेव्हा टायगरला, ‘या यशामागे सलमान आणि कॅटरिनाची केमिस्ट्री आहे काय?’ असे विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, ‘जेव्हा आपण प्रोडक्शनवर पैसा खर्च करतो मात्र चित्रपटाची कथा चांगली नसेल तर प्रेक्षकांना तो चित्रपट फारसा भावत नाही. आम्ही प्रेमकथेला एका वेगळ्या आणि योग्य अ‍ॅँगलने प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्ही यशस्वी होताना दिसून येत आहे. 



दरम्यान, सलमानच्या या चित्रपटाने आतापर्यंत बरेचसे रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. देशभरात हा चित्रपट ४६०० स्क्रीनवर तर विदेशात ११०० स्क्रीनवर दाखविण्यात आला. हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. चित्रपटात सलमान-कॅटसह अंगद बेदी, परेश राव, अनुप्रिया, कुमुद मिश्रा, सुदीप संजीव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘एक था टायगर’चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. तर ‘जिंदा है टायगर’चे दिग्दर्शन ‘सुलतान’ फेम अली अब्बास जफर यांनी केले. चित्रपटाला यशराज फिल्म्सने प्रोड्यूस केले आहे. 

Web Title: Salman Khan gave credit to success of 'Tiger Zinda Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.