"बॉम्बने त्याची गाडी उडवून देऊ", सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:37 IST2025-04-14T10:37:24+5:302025-04-14T10:37:43+5:30

Salman Khan Death Threat: पुन्हा एकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Salman Khan gets death threat again msg saying actor car will blow by bomb blast | "बॉम्बने त्याची गाडी उडवून देऊ", सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

"बॉम्बने त्याची गाडी उडवून देऊ", सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमानला वारंवार बिश्नोई गँगकडून जीवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून येणाऱ्या धमक्या पाहता अभिनेत्याच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअप नंबरवर सलमानला जीवे मारण्याचा धमकीवजा मेसेज करण्यात आला आहे. बॉम्बने सलमान खानची गाडी उडवून देऊ त्याबरोबरच सलमानला घरात घुसून मारू, अशी धमकी देण्यात आली आहे. सलमानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोई गँगकडून देण्यात आली आहे का, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, अलिकडेच सलमानचा 'सिकंदर' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ईदच्या मुहुर्तावर ३० मार्चला सलमानने चाहत्यांना खास गिफ्ट दिलं. सलमानचा सिकंदर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने आत्तापर्यंत १०९ कोटींचा गल्ला जमवला आहे. सलमान खानसोबत सिनेमात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. 

Web Title: Salman Khan gets death threat again msg saying actor car will blow by bomb blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.