सलमान खानला काय बर्थ डे गिफ्ट देणार यूलिया वेंटर?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2016 02:36 PM2016-12-20T14:36:13+5:302016-12-21T16:51:14+5:30
सलमान खान येत्या २७ डिसेंबरला ५१ वर्षांचा होणार आहे. गतवर्षी पन्नासाव्या वाढदिवशी सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर ग्रँड ...
स मान खान येत्या २७ डिसेंबरला ५१ वर्षांचा होणार आहे. गतवर्षी पन्नासाव्या वाढदिवशी सलमानने त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर ग्रँड पार्टी दिली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सलमानची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वेंटर ही सुद्धा सलमानच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये सामील झाली होती. यंदा पुन्हा एकदा पनवेल येथील फार्म हाऊसवर सलमानच्या वाढदिवसाची जंगी पार्टी रंगणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी सुद्धा यूलिया या पार्टीत सहभागी होणार आहे. आता यूलिया सलमानच्या बर्थ डे पार्टीला जाणार म्हणजे, ती सलमानला बर्थ डे गिफ्टही देणार. पण काय?
काल स्टारडस्ट अवार्ड सोहळ्यांत सलमान व यूलिया एकत्र पोहोचले. यावेळी यूलियाना नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. तू सलमानला वाढदिवसाची काय भेट देणार? असे तिला विचारले गेले. या प्रश्नासोबतच यूलियाची कळी चांगलीच खुलली. मी सलमानला काय भेट देणार, मला माहित नाही. कदाचित माझ्या मनात त्याच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदर हेच मी त्याला गिफ्ट करेल, असे ती म्हणाली. सलमानच्या वाढदिवसासाठी काही खास प्लॅनिंग केलेयं का? असेही तिला विचारले गेले. या प्रश्नाचे थेट उत्तर देणे मात्र यूलियाने मोठ्या शिताफीने टाळले. बघू...केवळ एवढेच ती म्हणाली.
आता यूलियाने या प्रश्नाचे उत्तर टाळले असले तरी तिच्या चेह-याचे हास्य मात्र बरेच काही सांगून गेले.
गेल्या वर्षभरापासून सलमान व यूलियाच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. मध्यंतरी त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठल्या तशाच त्यांच्या बे्रकअपच्याही. पण अलीकडे सलमान व यूलिया पुन्हा परत दिसू लागले आहेत. यूलियाच्या चेह-यावरील आनंद लपता लपत नाहीय. आता यामागचे कारण तिला अन् सलमानलाच माहित??