फ्लॉप सिनेमांवर सलमानची हटके स्टाईल फटकेबाजी, म्हणाला, 'आजकालचे काही दिग्दर्शक...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:07 IST2023-04-06T16:06:55+5:302023-04-06T16:07:35+5:30
सिनेमे फ्लॉप का होत आहेत यावर सलमानने त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय

फ्लॉप सिनेमांवर सलमानची हटके स्टाईल फटकेबाजी, म्हणाला, 'आजकालचे काही दिग्दर्शक...'
दबंग अभिनेता सलमान खानने (Salman Khan) नुकतेच एका अवॉर्ड शोच्या पत्रकार परिषदेत हजेरी लावली. यावेळी त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. मग ते त्याला मिळत असलेली धमकी प्रकरण असो किंवा बॉलिवूडचा वाईट काळ अशा अनेक विषयांवर सलमानने त्याच्याच अंदाजात फटकेबाजी केली. यावेळी त्याला चित्रपट का चालत नाहीत असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने स्पष्टच उत्तर दिले.
सलमान खान म्हणाला, 'खराब सिनेमे बनवाल तर कसे चालतील. प्रत्येकाच्याच डोक्यात असतं की आम्ही मुघल ए आजम बनवू, शोले बनवू, हम आपके है कौन बनवू, दिलवाले बनवू पण परिणामी असे सिनेमे बनतच नाहीत. कारण आजकालचे काही दिग्दर्शक त्यांचं नाव घेणार नाही पण ते स्वत:ला काय समजतात काय माहित. त्यांना वाटतं हिंदुस्तान फक्त कुलाबा ते अंधेरीपर्यंतच आहे. पण हिंदुस्तान तितकाच नाहीए. मग सलमान हसतच म्हणचो मी हे सांगतोय कारण माझा सिनेमा किसी का भाई किसी की जान येत आहे. हे मला महागात नाही पडलं पाहिजे. स्वत: मोठमोठ्या गोष्टी बोलत होता आणि स्वत:च काय केलं.'
असं बोलून सलमान जोरजोरात हसायला लागला. तो म्हणतो, मी हे गंमतीत बोलतोय. सलमान खान चा सिनेमा 'किसी का भाई किसी की जान' लवकरच प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर ही कलाकार मंडळी झळकली आहेत.